शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोफत होणार Entertainment! Smart TV, कंम्प्युटरवर असं करा Reliance Jio TV अॅप इन्स्टॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 6:13 PM

1 / 15
देशातील दिग्गज नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी Reliance Jio TV अॅपसह आपल्या ग्राहकांना मनोरंजनाचा ऑप्शनही देत आहे. याद्वारे ग्राहकांना लाईव्ह चॅनल्सही पाहता येतात.
2 / 15
जर तुमच्याकडे हे अॅप असेल तर तुम्हाला DTH कनेक्शन घेण्याची गरज नाही. जर तुम्ही रिलायन्स जिओच्या नेटवर्कचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी Reliance Jio TV अॅप मोफत पाहता येणार आहे.
3 / 15
या अॅपचा वापर तुम्हाला केवळ Android Smartphone, टॅब्स आणि जिओ सेट टॉप बॉक्सवर करता येणार आहे. सध्या कंपनीनं स्मार्ट टीव्ही, कंप्म्युटर आणि लॅपटॉपवर सपोर्ट करणारं अॅप लाँच केलं नाही. त्यामुळे तुम्ही या डिव्हाईसेसवर Reliance Jio TV App वरील कंटेन्ट पाहू शकत नाही.
4 / 15
Reliance Jio TV App हे स्मार्ट टीव्हीसाठी उपलब्ध नसलं तरी तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय स्मार्ट टीव्ही अॅपचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करावी लागेल.
5 / 15
तुमच्या Android टीव्हीमध्ये असलेल्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला Kodi हे अॅप सर्च करावं लागेल. त्यानंतर तुमच्या स्मार्ट टीव्हीमध्ये Kodi हे अॅप डाऊनलोड करा आणि इन्स्टॉल करा.
6 / 15
Kodi हे अॅप ओपन करून त्याच्या सेटिंग्समध्ये जा आणि File Manager वर क्लिक करा. त्या ठिकाणी असलेल्या अॅड सोर्स या ऑप्शनवर क्लिक करा.
7 / 15
या ठिकाणी तुम्हाला https://kodi.botallen.com टाईप करायचं आहे. त्यानंतर त्याला 'BotAllen' हे नाव द्यायचं आहे.
8 / 15
त्यानंतर तुम्हाला सेटिंग्स मेन्यूमध्ये अॅड ऑनमध्ये जाऊन इन्स्टॉल फ्रॉम झिप फाईलवर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला BotAllen निवडावं लागेल आणि त्यानंतर repository.botallen zip file वर क्लिक करावं लागेल.
9 / 15
जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला अॅड ऑनवर जावं लागेल. त्यानंतर रिपॉझिटरीमधून इन्स्टॉलवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर पुन्हा BotAllen Repository सिलेक्ट करून व्हिडीओ ऑन वर क्लिक करा. त्या ठिकाणी असलेल्या Jio App वर क्लिक करा.
10 / 15
त्यानंतर रिपॉझिटरी Kodi अॅपमध्ये अॅप इन्स्टॉल करेल. त्यानंतर हे पूर्ण झाल्यावर तुम्ही Kodi अॅपमध्ये Jio TV लाँच कराल तेव्हा कॉन्फिगर करण्याचं ऑप्शन येईल. त्यानंतर कॉन्फिगमध्ये जाऊन तुम्हाला PVR क्लायंटवर क्लिक करावं लागेल. तसंच त्यानंतर क्लायंट लिस्टमधून डाऊनलोड करायचा आहे.
11 / 15
हे पोस्ट केल्यानंतर तुम्हाला कॉन्फिगर लॉग इन ऑप्शनवर जायचं आहे. त्यानंतर कीबोर्ड आणि OTP ची निवड करावी लागेल. आता तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जिओ क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.
12 / 15
त्यानंतर तुम्ही सहजरित्या हे अॅप ओपन करू शकाल आणि Jio TV चा आनंद आपल्या स्मार्ट टीव्हीमध्ये घेऊ शकाल.
13 / 15
लॅपटॉपमध्ये जिओ टीव्ही पाहण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला अँड्रॉईड सिम्युलेटर अॅप डाऊनलोड करावं लागेल. प्रथम तुम्हाला Bluestacks.com या वेबसाईटवर जावं लागेल. तसंच या ठिकाणी असलेला इम्युलेटर तुम्हाला अॅप इन्स्टॉल करण्यासाठी वापरावा लागेल.
14 / 15
तुमच्या लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमध्ये इम्युलेटर इन्स्टॉल करा आणि आपल्या गुगल अकाऊंटच्या मदतीनं साईन अप करा. त्यानंतर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन JioTV सर्च करा.
15 / 15
Bluestacks वर अॅप डाऊनलोड करा आणि इन्स्टॉल करा. त्यानंतर डाऊनलोड झालेलं अॅप ओपन करा. त्यानंतर ओटीपीसाठी तुम्हाला Jio मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला आलेला ओटीपी टाकून तुम्ही ते अॅप वापरू शकता.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओTelevisionटेलिव्हिजनlaptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान