शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Facebook आणि Twitterची कमाई कशी होते? काय आहे त्यांचे बिझनेस मॉडेल? जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 2:44 PM

1 / 12
भारतातील 1.25 अब्ज लोकसंख्येपैकी सुमारे 70 कोटी लोकांकडे फोन आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, यापैकी 25 कोटी लोक स्मार्टफोन वापरतात. चीननंतर भारत हा दुसरा देश आहे, जिथे सर्वाधिक लोकांकडे स्मार्टफोन आहे. याशिवाय, दरमहा 15 कोटींहून अधिक लोक दररोज फेसबुकवर येतात. जगाबद्दल बोलायचे झाले तर, जगाची लोकसंख्या 7.79 अब्ज आहे, त्यापैकी 3.96 अब्ज सोशल मीडिया युजर्स आहेत. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 51 टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात.
2 / 12
ही आकडेवारी पाहता राजकीय पक्ष ऑनलाइन प्रचार किंवा सोशल मीडियाच्या वापराला महत्त्व का देतात, हे समजणे फार अवघड नाही. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाची भूमिका व्यावसायिक ते वैयक्तिक कामापर्यंत खूप वाढली आहे. जगात सोशल मीडियाची क्रेझ कशी वाढत आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, आता जगात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या न वापरणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
3 / 12
नोकरी शोधणे असो किंवा पोस्ट करण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे असो. या प्लॅटफॉर्मचा वापर गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढला आहे. फेसबुक आणि ट्विटर पूर्णपणे विनामूल्य आहेत. आतापर्यंत आपल्याला फेसबुक किंवा ट्विटर वापरण्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की, फेसबुक किंवा ट्विटर अब्जावधी रुपये कसे कमवतात आणि त्यांचे बिझनेस मॉडेल कसे काम करते?
4 / 12
फेसबुक कुठून किती कमावते? कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी त्याच्या व्यवसाय मॉडेलचा मोठा वाटा असतो. व्यवसाय व्यवस्थित चालवण्यासाठी प्रत्येक कंपनीला व्यवसाय व्यवस्थापन मॉडेलची आवश्यकता असते. सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल बोलायचे झाले तर फेसबुक केवळ जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवतो. सोप्या भाषेत, Facebook कमाईचे सर्वात मोठे साधन म्हणजे जाहिरात. कंपनी आपल्या वेबसाइट आणि अॅपवर जाहिरात दाखवून पैसे कमवते.
5 / 12
2020 मध्ये फेसबुकने 6.38 लाख कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. फेसबुकच्या एकूण कमाईपैकी 98 टक्के कमाई, फक्त जाहिरातीतून होते. यातील 45 टक्के कमाई अमेरिका आणि कॅनडामधून येते, तर 55 टक्के कमाई उर्वरित देशांमधून येते. फेसबुकने 2020 मध्ये केवळ भारतीय बाजारातून 9 हजार कोटींची कमाई केली होती.
6 / 12
फेसबुकवर जाहिराती कशा मिळवतो? तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउझरवर किंवा तुमच्या स्मार्टफोनवर फेसबुक उघडता, तेव्हा तुमच्या मित्रांच्या पोस्ट्ससोबत युजर्सना अशा काही पोस्ट्सही दिसतील ज्यांना त्यांनी कधीही लाईक किंवा फॉलो केले नाही. अशा बहुतांश पोस्ट कोणत्यातरी व्यवसाय, उत्पादन किंवा सेवेशी संबंधित असतात. याचा आपल्याशा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या संबंध आलेला असतो.
7 / 12
फेसबुक वापरताना यूजर्सना दिसणाऱ्या अशा सर्व पोस्ट्स पेड असतात. म्हणजेच पैसे देऊन फेसबुकवर त्यांची जाहिरात केली जाते. या प्रायोजित पोस्ट फोटो, व्हिडिओ, स्लाइड्स किंवा इतर कोणताही फॉर्मॅटमध्ये असू शकतात. फेसबुक जगभर पसरले आहे, त्यामुळेच जाहिरातीच्या माध्यमातून फेसबुक बक्कळ कमाई करतो.
8 / 12
यासाटी फेसबुकने 'फेसबुक बिझनेस' नावाचा नवा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. हे व्यासपीठ फक्त जाहिरातींसाठी वापरले जाते. याचा वापर करून, युजर्स त्यांच्या उत्पादनाची जाहिरात तयार करू शकतात आणि ही जाहिरात अॅप किंवा वेबसाईटवरुन इतर युजर्सपर्यंत पोहचवू शकतात. भारतात Facebook वर जाहिरात प्रकाशित करण्यासाठी किमान रक्कम 40 रुपये आहे.
9 / 12
ट्विटरवरून किती कमाई होते? 27 ऑक्टोबर रोजी इलॉन मस्कने ट्विटर खरेदीची घोषणा केली. ट्विटरसोबत त्यांचा 44 अब्ज डॉलर म्हणजेच 3.65 लाख कोटी रुपयांचा करार झाला होता. ट्विटरचा नवा बॉस बनताच इलॉन मस्कने नियम बदलले आणि आता ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. स्पॅम आणि घोटाळ्यांना सामोरे जाण्यासाठी हा नियम आवश्यक असल्याचे मस्क यांनी सांगितले.
10 / 12
ट्विटरवर मेटा सारख्या अनेक सुविधा नाहीत, यावर फक्त पोस्ट टाकता येते. ट्विटरच्या वार्षिक अहवालानुसार, या प्लॅटफॉर्मवर कमाईचे दोनच मार्ग आहेत. प्रथम- जाहिरातीतून आणि दुसरे- डेटा परवान्यातून. तुम्हाला सोप्या भाषेत जाहिरात समजत असेल, तर ज्या कंटेंटची किंवा उत्पादनाची जाहिरात केली जाते. तर, डेटा परवाना म्हणजे कंपनी युजर्सना काही डेटा विकते, ज्याद्वारे त्यांना त्यांच्या आवडीच्या जाहिराती दाखवता येते.
11 / 12
गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये कंपनीचा एकूण महसूल $ 5 अब्ज (42,160 कोटी रुपये) होता. यापैकी 4.6 अब्ज डॉलर म्हणजेच 37,410 कोटी रुपये जाहिरातीतून आणि 0.51 अब्ज डॉलर म्हणजेच 4,750 कोटी रुपये डेटा लायसन्सिंगमधून मिळाले. म्हणजेच ट्विटरच्या कमाईत फक्त जाहिरातींचा वाटा 89 टक्के आहे.
12 / 12
ट्विटर गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात चालले आहे, त्यामुळे सध्या इलॉन मस्क यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे, ते म्हणजे कंपनीचे उत्पन्न वाढवणे. याच वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीला $270 दशलक्ष तोटा झाला होता. तर, गेल्या वर्षी $221 दशलक्ष (रु. 1,800 कोटी) नुकसान झाले होते. आता इलॉन मस्क या तोट्यातून बाहेर कसे येणार, हे पाहणे महत्वाचे आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानFacebookफेसबुकTwitterट्विटरbusinessव्यवसाय