facebook changed in 2019 here are some features and changes that rolled out this year
वर्षभरात असं बदललं फेसबुक, 'हे' नवीन फीचर्स ठरले सुपरहिट By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 2:34 PM1 / 9फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं.2 / 9संवाद साधण्यासाठी फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. 2019 या वर्षात फेसबुकने आपल्या युजर्ससाठी अनेक खास फीचर्स आणले आहेत. वर्षभरात फेसबुकमध्ये अनेक बदल झाले.3 / 9फेसबुकने आपला नवीन लोगो लाँच केला. फेसबुकच्या नव्या लोगोमध्ये सर्व इंग्लिश अक्षरं ही कॅपिटलमध्ये दिसणार आहेत. नवा लोगो GIF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला असून तो मूव्हिंग आहे. फ्लॅट FACEBOOK हे कॅपिटल लेटर्समध्ये लिहिण्यात आले आहे.4 / 9फेसबुक स्टोरी अनेकदा स्पॉन्सर्ड अॅड्स दाखवल्या जातात. तसेच स्टोरीवर स्वाईप करून युजर्स अॅड्समध्ये दाखवण्यात आलेले प्रोडक्ट एक्सप्लोर करू शकतात. 5 / 92019 मध्ये क्लियर हिस्ट्री/ऑफ-फेसबुक अॅक्टिव्हिटी हे फीचर रोलआऊट केलं गेलं. या फीचरच्या मदतीने सेटिंग्समध्ये जाऊन युजर्स अॅप्स आणि लिंक्सशी संबंधित हिस्ट्री क्लिअर करता येते. 6 / 9फेसबुकने आपली डेटिंग सर्व्हिस सुरू करण्याबाबत घोषणा केली आहे. मात्र भारतात हे फीचर उपलब्ध नाही. 7 / 9फेसबुकने आपलं 'फेसबुक पे' लाँच केलं आहे. यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. 8 / 9फेसबुक आपल्या युजर्सना मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसाची आठवण करून देतं. तसेच फेसबुक स्टोरीच्या मदतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा पर्याय देण्यात येतो. 9 / 9फेसबुकने आपलं Facebook Watch हे फीचर काही वर्षांपूर्वी लाँच केलं होतं. मात्र 2019 मध्ये ते लाईव्ह टीव्हीसाठी इंट्रोड्यूस करण्यात आले आहे. यामुळे युजर्स इतरांना वॉच पार्टीसाठी इन्व्हाईट करू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications