शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फेसबुकवरची 'ती' एक चूक पडली महागात; थेट 2 वर्षांचा तुरुंगवास; तुम्ही करत नाही ना असं काही?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 11:41 AM

1 / 7
फेसबुकवरील चुकीची माहिती एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. या एका चुकीमुळे त्या व्यक्तीला तुरुंगात जावे लागले. चुकीची शिक्षा म्हणून त्या व्यक्तीला दोन वर्ष जेलमध्ये टाकण्यात आले. व्हिएतनाममध्ये ही घटना घडली आहे, जिथे फेसबुकवर चुकीची पोस्ट केल्यानंतर जेलमध्ये जावं लागतं.
2 / 7
फक्त व्हिएतनाममध्येच नाही तर भारतातही फेसबुकवर चुकीची पोस्ट करणं महागात पडू शकतं. कारण फेक न्यूजला आळा घालण्यासाठी सरकार आणि फेसबुकने कडक नियम लागू केले आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या चुका तुम्हाला तुरुंगात टाकू शकतात ते जाणून घेऊया.
3 / 7
फक्त फेसबुकच नाही, तर तुम्ही इन्स्टाग्राम, Whatsapp सारख्या इतर सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट टाकल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. सोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो.
4 / 7
सोशल मीडियावर चुकीची माहिती देणं टाळा. सोशल मीडियावर डोळे झाक करून कोणताही मेसेज पाठवू नये. तसेच मेसेज पाठवण्यापूर्वी एकदा क्रॉस चेक करून घ्या. अफवा पसरवणारे अनेक मेसेज हे तुफान व्हायरल होत असतात. पण हे दुसऱ्यांना पाठवू नका. याबाबत अलर्ट राहा.
5 / 7
जर तुम्ही चित्रपट पायरसीमध्ये सामील असाल तर तुम्हाला सिनेमॅटोग्राफी कायदा 1952 अंतर्गत किमान 3 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणताही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी कॉपीराईटची काळजी घेतली पाहिजे.
6 / 7
गर्भपात कसा करायचा हे गुगलवर सर्च केल्यास ते बेकायदेशीर आहे. असं केल्याने तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते, कारण भारतात गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर गर्भपाताचा सल्ला पोस्ट करणे टाळावे.
7 / 7
सोशल मीडियावर परवानगीशिवाय कोणाचाही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करणे गुन्हा आहे. यासाठी तुरुंगात जावे लागू शकते. प्रत्येक जण आपल्या भावना, फोटो, व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करत असतं पण असं असताना इतरांच्या भावना त्यामुळे दुखावल्या जाऊ नये याची काळजी घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :FacebookफेसबुकjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया