शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! Facebook वर 'या' 3 चुका केल्यास थेट अकाऊंट होणार ब्लॉक; वापरण्यापूर्वी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 3:37 PM

1 / 8
स्मार्टफोन आज केवळ कॉलिंगसाठीच नाही तर प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तसेच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची क्रेझ लोकांमध्ये खूप वाढली आहे. हल्ली प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर आपल्याला आढळेल.
2 / 8
फेसबुक हे संवाद साधण्याचं एक लोकप्रिय माध्यम आहे. अनेक जण फेसबुकवर फोटो, व्हिडीओसह नवनवीन गोष्टी शेअर करत असतात. तुम्ही सुद्धा फेसबुकवर असाल आणि ते रोज वापरत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात.
3 / 8
फेसबुकचा वापर करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं फेसबुक अकाउंट देखील ब्लॉक होऊ शकते. त्यामुळे त्याचा नीट वापर करणं गरजेचं आहे. कोणत्या चुका टाळायच्या हे जाणून घेऊया...
4 / 8
जर तुम्ही फेसबुक मेसेंजरवर कोणाशी बोलत असाल किंवा एखाद्याच्या पोस्टवर काही कमेंट लिहित असाल तर एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कोणालाही धमकावू शकत नाही.
5 / 8
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला धमकी देताना आढळल्यास तुमचं फेसबुक अकाऊंट थेट ब्लॉक केले जाऊ शकतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीशी बोलताना, त्याच्या पोस्टवर कमेंट करताना नीट काळजी घ्या.
6 / 8
फेसबुकचे धोरण अतिशय कडक आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे भडकाऊ पोस्ट किंवा कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा फोटो शेअर करू शकत नाही. असं केल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते.
7 / 8
कोणत्याही प्रकारे लोकांमध्ये द्वेष पसरवताना पकडले गेलात तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. यासोबतच तुमचे अकाऊंटही ब्लॉक केले जाऊ शकते. फेसबुककडून देखील अशा पोस्टबाबत वॉर्निंग दिली जाते.
8 / 8
जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून अशा कोणत्याही दहशतवादी संघटनेत सामील झालात किंवा कोणत्याही दहशतवादी कारवाईत सामील असल्याचे आढळल्यास, तुमच्यावर कारवाई करून तुमचं अकाऊंट ब्लॉक केलं जाऊ शकतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान