facebook officially launched tiktok like short videos feature facebook reels in india
मस्तच! आता फेसबुकवर येणार टिकटॉकसारखी धमाल, Facebook Reels भारतात लाँच By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 4:38 PM1 / 17फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. आता फेसबुक युजर्ससाठी एक खूशखबर आहे. कारण फेसबुकने आणखी एक भन्नाट फीचर लाँच केलं आहे.2 / 17फेसबुकवर आता टिकटॉकसारख्या शॉर्ट व्हिडीओची मजा घेता येणार आहे. जगभरातील सर्वात मोठी सोशल मीडिया वेबसाईट असलेल्या फेसबुकने आता फेसबुक रील्स (Facebook Reels) फीचर अधिकृतपणे लाँच केलं आहे. 3 / 17नव्या फीचरची सुरुवात ही भारतापासून करण्यात आली आहे. गेल्या वर्षापासून या फीचरचं टेस्टिंग केलं जात होतं. तसेच फेसबुकने काही इन्स्टाग्राम क्रिएटर्सला आपली रील्स थेट फेसबुकवर शेयर करण्याची सुविधा मिळणार असल्याचं म्हटलं होतं. 4 / 17फेसबुकने टिकटॉक सारखे छोटे व्हिडीओजला रील्स नाव दिलं आहे. फेसबुक रील्स एकदम Instagram Reels सारखे आहे. या फीचरद्वारे युजर्स काही सेकंदाचे व्हिडीओज बनवून ते शेअर करू शकतील. हे व्हिडिओज न्यूज फीडमध्ये दिसतील. 5 / 17युजर्स फेसबुक म्यूझिक लायब्रेरीमधून कोणतेही साँग सिलेक्ट करू शकतील. वेगवेगळे व्हिडीओ बनवून ते वेगवेगवळे इफेक्ट देऊन एक टाइमर सेट करू शकतील. यात व्हिडीओचा स्पीड हा कमी जास्त करता येतो. 6 / 17कंपनी फेसबुक आणि इन्स्टाग्राम रील्सला सध्या वेगवेगळं ठेवणार आहे. फेसबुक रील्सला फक्त फेसबुक न्यूज फीडवर शेअर करण्याचा पर्याय दिला आहे. याचपद्धतीने इन्स्टाग्राम रील्स त्या Appवर शेअर करू शकतील. 7 / 17फक्त निवडक क्रिएटर्स असतील त्यांना इन्स्टाग्राम रील्सला फेसबुकवर शेअर करण्याची परवानगी दिली जाईल. ही सुविधा सर्व युजर्ससाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल. यासंबंधीची माहिती अद्याप दिली नाही. 8 / 17नवीन फीचर द्वारे फेसबुक भारतात शॉर्ट व्हिडिओच्या क्रेझला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्याला टिकटॉकने सुरू केले होते. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर कंपनीने इन्स्टाग्राम रील्स सुरू केले होते.9 / 17भारतात युजर्सला Reels नावाने एक वेगळा टॅब मिळतो. याची सुरुवात भारतातून झाली आहे. तसेच Instagram Lite App वरसुद्धा हे फीचर सर्वात आधी भारतीय युजर्सला दिले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 17फेसबुक हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक त्यांचा बराचसा वेळ हा त्यांच्या ऑनलाईन मित्रांसह आणि इतर गोष्टींमध्ये घालवत असतात. एखादी व्यक्ती कुठूनही तुमचं फेसबुकवरील प्रोफाईल पाहू शकतं.11 / 17काही जण गुपचूप आपंल प्रोफाईल चेक करत असतात. त्यांच्या उद्देश हा वेगवेगळा असू शकतो. मात्र कोणी कोणी आपलं प्रोफाईल चेक केलंय याची माहिती सहज मिळवणं शक्य आहे. यातून आपण सतर्क होऊ शकतो.12 / 17कोणती व्यक्ती आपली प्रोफाईल नेहमी स्टॉक करतं. तसेच तुमचं प्रोफाईल कोणी कोणी पाहिलं अथवा कोण पाहतंय? हे जाणून घेण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे. ते जाणून घेऊया...13 / 17सर्वात आधी Facebook.com वर जाऊन वेबवर तुमचं फेसबुक अकाऊंट ओपन करा. यासाठी तुम्ही कोणत्याही ब्राऊझरचा वापर करू शकता.14 / 17तुम्ही तुमच्या फेसबुक पेज किंवा टाईमलाईनवर पोहोचलात की राईट क्लिक करा आणि व्ह्यू पेज सोर्सवर क्लिक करा. फेसबुक सोर्स पाहण्यासाठी राईट क्लिक करुन Page व्ह्यू सोर्स या पर्यायाची निवड करा. पेज सोर्स ओपन झाल्यावर ‘CTRL + F’ वर टॅप करा.15 / 17आता सर्च बारवर जाऊन ‘BUDDY_ID’ टाईप करा आणि एंटर बटणावर क्लिक करा. तिथे ‘BUDDY_ID’ च्या शेजारी अनेक फेसबुक प्रोफाईल आयडी पाहायला मिळतील.16 / 17‘BUDDY_ID’ च्या शेजारी एक एक 15 अंकी कोड दिसेल तो कोड कॉपी करा आणि दुसऱ्या पेजवर फेसबुक ओपन करा. नव्या टॅबवर Facebook.com/15-digit code पेस्ट करुन एंटर बटणवर क्लिक करा. 17 / 17तुमची प्रोफाईल पाहणाऱ्या व्यक्तीची प्रोफाईल तुमच्यासमोर ओपन होईल. ज्यांनी तुमचं प्रोफाईल चेक केलंय त्या विशेष प्रोफाईलचा स्क्रीनश़ॉट घेऊ शकता. तसेच याबाबत इतरांना देखील याबाबत अलर्ट करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications