शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fake Loan App: ऑनलाईन अॅपद्वारे कर्ज घेताय? मग थांबा...तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 8:59 PM

1 / 6
Fake Loan App: आजकाल अनेकजण ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज घेत आहेत. अशाप्रकारची अॅप तुम्हाला अडचणीच्या काळात कमी व्याजदरावर त्वरित कर्ज उपलब्धत करुन देतात. पण, अशाप्रकारच्या अॅपवरुन कर्ज घेणे धोक्याचे ठरू शकते. ऑनलाइन लोन अॅपवरुन कर्ज घेतल्यानंतर फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत, 2020 नंतर यात मोठी वाढ झाली आहे.
2 / 6
या कर्ज देणार्‍या अॅप्सचे काम गरजू ग्राहकांना झटपट कर्ज देणे हे आहे. परंतु, या लोन अॅप्समधून कर्ज घेण्याशी संबंधित अनेक धोके आहेत. या धोक्यांना ओळखण्यासाठी, फिनटेक असोसिएशन फॉर कन्झ्युमर एम्पॉवरमेंट (FACE) आणि सेंटर फॉर फायनान्शियल इन्क्लुजन (CFI) ने Fintech लेंडिंग रिस्क बॅरोमीटर लाँच केले आहे.
3 / 6
याद्वारे अॅपवरुन कर्ज घेतलेल्या 40 ग्राहकांमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत एक अभ्यास करण्यात आला आणि ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. या अभ्यासातून ऑनलाईन कर्ज घेण्यात किती धोका आहे, हे शोधण्यात आले.
4 / 6
या सर्वेक्षणात 90 टक्के लोकांनी सांगितले की, अनेक फिनटेक लेंडर्स म्हणजेच अॅपद्वारे ऑनलाइन कर्ज पुरवणाऱ्या वित्तीय संस्था अप्रामाणिक आहेत. असे फिनटेक कर्ज देणारे अनधिकृत असून, हाय प्रोसेसिंग फी आकारतात. तसेच, अटी व शर्तींची चुकीची माहिती देतात आणि आक्रमकपणे कर्ज गोळा करतात.
5 / 6
या सर्वेक्षणात 83 टक्के लोकांनी सांगितले की, ऑनलाइन अॅप्सवरून कर्ज घेताना सायबर फसवणूक होण्याचा धोका असतो. हे डिजिटल सावकार सोशल मीडियावर बनावट पेज तयार करतात आणि कर्जाच्या बहाण्याने लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करतात. आरबीआयच्या डिजिटल कर्जावरील ग्रुपला सुमारे 1,100 कर्ज देणारी अॅप्स आढळली, त्यापैकी सुमारे 600 बेकायदेशीर आहेत.
6 / 6
या सर्वेक्षणात, 73 टक्के लोकांनी डेटा गोपनीयतेला 7 पैकी 5.1 गुणांसह गंभीर धोका मानले. डेटा संरक्षण कायद्यांचा अभाव आणि मानकांचा अभाव यामुळे धोका वाढला आहे. ही अॅप्स इंस्टॉल झाल्यानंतर युजरची खासगी माहिती मागतात आणि त्या व्यक्तीलाही माहिती द्यावी लागते. त्यामुळे आपली खासगी माहिती बाहेर येण्याचाही धोका आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानfraudधोकेबाजीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक