शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

FAU-G ला दणका! गुगल प्ले स्टोरवरील रेटिंग ४.७ वरून थेट ३.२ वर

By देवेश फडके | Published: February 03, 2021 8:50 PM

1 / 9
नवी दिल्ली : २६ जानेवारी २०२१ रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी मोठ्या धूमधडाक्यात लॉन्च झालेला FAU-G ला युझर्सकडून मोठा दणका बसला आहे. कारण गुगल प्ले स्टोरवरील या गेमच्या रेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 9
FAU-G गेम हा nCore कंपनीने विकसित केला आहे. PUBG गेमला भारतात बंदी घातल्यानंतर गेमर्सना पर्याय म्हणून FAU-G गेमची निर्मिती करण्यात आली होती. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार FAU-G चा ब्रॅण्ड अम्बेसिडर आहे.
3 / 9
FAU-G गेमची घोषणा झाल्यापासून या गेमबाबत युझर्समध्ये मोठी उत्सुकता होती. लॉन्चिंगपूर्वी हजारो युझर्सनी नोंदणीही केली होती. मात्र, गुगलवरील घसरलेल्या रेटिंगनंतर आता हा गेम युझर्सच्या पसंतीस उतरलेला दिसत नाही.
4 / 9
पहिल्या २४ तासांत FAU-G गेम मोठ्या प्रमाणावर डाऊनलोड करण्यात आला आहे. या गेमला सुरुवातीला ४.७ रेटिंग देण्यात आले होते. मात्र, अवघ्या आठवडाभरातच या गेमचे रेटिंग घसरून ते ३.२ वर आले आहे.
5 / 9
या गेमकडून युझर्सना मोठी अपेक्षा होती. PUBG प्रमाणेच FAU-G गेम असेल, असे युझर्सना वाटले होते. मात्र, हा गेम भारतीय बनावटीचा असल्यामुळे तो गेमिंग एक्सपिरीमेंट मिळत नसल्याची तक्रार युझर्सकडून करण्यात आली आहे.
6 / 9
एका युझरने म्हटले आहे की, FAU-G बाबत सांगण्यात आले होते की, हा गेम PUBG गेमसारखा असेल. मात्र, हा गेम PUBG सारखा मूळीच नाही. यात अनेक त्रुटी आहेत. केवळ हातानेच फाइट करता येते. गन नाहीत. असे वाटते ही हा गेम पूर्णपणे अजूनही तयार झालेला नाही.
7 / 9
FAU-G गेममध्ये केवळ कॅम्पेन मोड दिल्यामुळे अनेक युझर्स नाराज असल्याचे सांगितले जात आहे. गुगल प्ले स्टोरवर आपली मते व्यक्त करत अनेकांनी FAU-G गेमला खूपच कमी रेटिंग दिले आहे.
8 / 9
बहुचर्चित गेम FAU-G प्रजासत्ताक दिनी लॉन्च झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत गुगल प्ले स्टोरवरून तब्बल १० लाख जणांनी हा गेम डाऊनलोड केला आहे. FAU-G गेमची ही क्रेझ लाँचिंगनंतर समोर आलेल्या डाऊनलोड्सच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली.
9 / 9
आताच्या घडीला हा गेम केवळ एकाच मोडवर खेळता येणार आहे. संपूर्ण गेमचा अनुभव घेण्यासाठी आणखी काही कालावधी वाट पाहावी लागणार आहे. आता या गेममध्ये कॅम्पेन मोड उपलब्ध आहे. या मोडमध्ये भारतीय सैन्यदलाचा एक अधिकारी त्याच्या टीमपासून वेगळा झाला आहे आणि त्याला शोधण्यासाठी बाकीचे अधिकारी आणि जवान मिशनवर जाणार आहेत.
टॅग्स :Mobileमोबाइलgoogleगुगल