This feature's will disappear soon from the phone ...
हे फिचर लवकरच फोनमधून गायब होतील... By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 12:08 PM1 / 6मोबाईल फोन लोकांच्या हाती खेळायला लागल्यापासून मोबाईल सोबत येणाऱ्या महत्वाच्या अॅक्सेसरीजची यापुढे गरज भासणार नाही. याशिवाय सध्या प्रचलित असलेली फिचर्सही नव्या पिढीच्या मोबाईलमधून गायब होतील...तशीही मोबाईल इंडस्ट्रीला अॅपलची री ओढायची सवय आहेच...चला पाहूया कोणती फिचर्स पडद्याआड जाणार आहेत...2 / 6गेल्या दोन, तीन वर्षांपासून फिंगर प्रिंट स्कॅनर हे फिचर जवळपास सर्वच मोबाईलमध्ये यायला लागले आहे. हे फिचर पुढील काळात गायब होऊ शकते. याजागी आता इनडिस्प्ले फिंगर प्रिंट स्कॅनर जरी आलेले असले तरी ते पुढील काही काळच राहणार आहे. यानंतर केवळ फेस आयडी सिक्युरिटीवर मोबाईलची सुरक्षा काम करणार आहे. आयफोनने नुकत्याच लाँच केलेल्या फोनमध्ये फिंगर प्रिंट स्कॅनर गायब झाला आहे. तसेच येणाऱ्या OnePlus 6T आणि Samsung S10 या फोनमध्येही फिंगर प्रिंट स्कॅनर नसण्याची शक्यता आहे. 3 / 6मोबाईल चार्जर सध्या फास्ट चार्जिंगच्या काळात वावरत आहेत. वायरलेस चार्जिंग अद्याप काही मोबाईलमध्येच असले तरीही ते लवकरच इतर मोबाईलमध्येही येणार आहे. यामुळे रोजच्या चार्जरला कंपन्या बायबाय करतील.4 / 6पुर्वी स्मार्टफोनमध्ये कमी मेमरी असायची. यामुळे मायक्रो एसडी कार्ड वापरून मेमरी वाढवावी लागत होती. आता कंपन्या मायक्रो एसडी कार्ड ऐवजी इनबिल्ट मेमरीच वाढवत आहेत. मायक्रो एसडी कार्डमुळे फोनचा परफॉर्मन्स कमी होतो. 5 / 6सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झालेला हेडफोनही लवकरच कालबाह्य होणार आहे. वायर होडफोन जॅकच नसल्यामुळे संगित कसे ऐकायचे....प्रश्न पडला असेल ना....उत्तर आहे वायरलेस हेडफोन. नव्या OnePlus 6T मध्ये होडफोन जॅक नसेल.6 / 6जीएसएम सिम कार्डही लवकरच गायब होतील. कारण आयफोनच्या नव्या फोनमध्ये eSIM सह ड्युअल सिम सपोर्ट आहे. यामुळे अँड्रॉईड कंपन्याही त्यांच्य नव्या मोबाईलमध्ये eSIM सुविधा सुरु करतील. सध्या भारतात जिओ आणि एअरटेल ही सुविधा पुरविणार असले तरीही इतरही कंपन्या eSIM ची सुविधा देण्यास सुरुवात करतील. आणखी वाचा Subscribe to Notifications