Flipkart Sale: फ्लिपकार्टचा जबरदस्त सेल सुरु; हे 8 मोबाईल फोन मिळतायत स्वस्तात....आयफोनही
By सिद्धेश जाधव | Updated: December 16, 2021 15:58 IST
1 / 9फ्लिपकार्टचा हा सेल 21 डिसेंबर पर्यंत सुरु राहील. या सेलमध्ये फक्त स्मार्टफोनच्या किंमतीवर डिस्काउंट दिला जात नाही, तर एसबीआय कार्ड धारकांना 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल. 2 / 96000mAh ची बॅटरी असलेला हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये फक्त 7,199 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनवर 300 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. 3 / 9एरव्ही 8,299 रुपयांमध्ये मिळणारा हा फोन सेलमध्ये 7,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. हा डिवाइस हेलियो जी35 ऑक्टाकोर प्रोसेसर, 13MP कॅमेऱ्यासह विकत घेता येईल. 4 / 9Realme GT Master Edition हा कंपनीचा मिड प्रीमियम फोन आहे. या फोनवर 1000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. 26,999 रुपयांचा मोबाईल या सेलमध्ये 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 5 / 9Motorola Edge 20 ची मूळ किंमत 29,999 रुपये आहे. परंतु 2,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन 27,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यात स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर, 8GB रॅम आणि 108MP चा रियर कॅमेरा मिळतो. 6 / 9या सेलमध्ये Infinix HOT 11S स्मार्टफोन 3,500 डिस्काउंटसह विकत घेता येईल. 13,999 रुपयांचा हा फोन 21 तारखेपर्यंत 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Helio G88 चिपसेट, 50 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आणि 90Hz रिफ्रेश रेटसह विकत घेता येईल. 7 / 9Moto G60 स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर, 6GB रॅम आणि 6000 एमएएचची बॅटरी मिळते. 19,990 रुपयांमध्ये लाँच झालेला हा फोन 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 8 / 9ROG Phone 3 हा एक गेमिंग फोन आहे. जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्लस चिपसेटसह बाजारात आला आहे. या फोनच्या 8 जीबी रॅम व्हेरिएंटवर 12,000 रुपये आणि 12 जीबी रॅम व्हेरिएंटवर 11,000 रुपयांची सूट मिळत आहे. 9 / 9iPhone 12 च्या 64GB व्हेरिएंटवर 15,450 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. सोबत एसबीआय क्रेडिट कार्डवर 10 टक्के सूट आणि 15,450 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल.