Flipkart tv days sale offering bumper discount on smart led tv know top deals
OMG! फक्त 7.5 हजारांत दमदार LED TV; नवीन वर्षात Flipkart देतंय बंपर डिस्काउंट By सिद्धेश जाधव | Published: January 01, 2022 1:18 PM1 / 6फ्लिपकार्टचा हा सेल 5 डिसेंबरपर्यंत सुरु राहील. सेलमध्ये फक्त थेट डिस्काउंट मिळणार नाही. तर तुमच्या आवडत्या टीव्ही मॉडेलवर बँक ऑफर्स देखील देण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊया या सेलमधील बेस्ट डील. 2 / 621,990 रुपयांचा हा स्मार्ट टीव्ही या सेलमध्ये 17,499 रुपयांना मिळत आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा 5 टक्के कॅशबॅक यावर देखील मिळेल. या स्मार्ट टीव्हीमध्ये कंपनीनं WebOS दिला आहे. तसेच यात नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, डीज्नी+हॉटस्टार आणि यूट्यूब इन-बिल्ट मिळतात.3 / 6या टीव्हीमध्ये इन-बिल्ट नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ आणि यूट्यूब सारखे अॅप मिळतात. तसेच शानदार साउंड क्वॉलिटीसाठी 20 वॉटचे स्पिकर देण्यात आले आहेत. शाओमीचा हा स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. अतिरिक्त 5 टक्के कॅशबॅकसाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. 4 / 6सेलमध्ये हा टीव्ही 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. नेटफ्लिक्स, प्राईम प्राइम व्हिडीओ, डिज्नी+हॉटस्टार आणि यूट्यूब इन-बिल्ट असलेल्या या टीव्हीवर फ्लिपकार्ट 25 टक्के सूट देत आहे. टीव्हीमध्ये 24 वॉटचे स्पिकर आहेत. 5 / 6सेलमध्ये हा 28 टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. त्यामुळे हा 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळेल. हा थॉमसनचा 24 इंचाचा टीव्ही 20 वॉटच्या स्पिकरसह बाजारात आला आहे. 6 / 6वनप्लस स्मार्ट टीव्ही तुम्ही कोटक बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास तुम्ही 2000 रुपयांची अतिरिक्त बचत करू शकता. फ्लिपकार्टवर हा टीव्ही 17,999 रुपयांमध्ये मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications