शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोण आहे लीना खान?; ज्यांनी दिग्गज कंपनी ‘Meta’ ला दिलं आव्हान; Insta, WhatsApp विकावं लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 3:43 PM

1 / 9
फेसबुक म्हणजे Meta ला Instagram आणि WhatsApp विकावं लागू शकतं? हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनीसाठी रेवेन्यूचा मोठा भाग आहेत परंतु कंपनी असं का करत आहे? याचं कारण आहे फेडरल ट्रेड कमीशन. ज्याचं नेतृत्व लीना खान (Lina Khan) करत आहेत.
2 / 9
लीना खान हिला मागील मार्च महिन्यात अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी कमीशनवर नियुक्त केले होते. फेडरल ट्रेड कमीशनला फेडरल जजकडून हिरवा कंदिल मिळाला आहे. ज्यानंतर कमीशन दिग्गज टेक कंपनी Meta ला कोर्टात खेचू शकतं.
3 / 9
मागील वर्षीही एजेन्सी मेटाविरोधात कोर्टात गेली होती. त्यावेळी कोर्टाने कमी माहिती उपलब्ध असल्याने या प्रकरणावर सुनावणी केली नाही. परंतु यावेळी FTC ने तक्रारीत बदल करत कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. सोशल नेटवर्क साईटवर Meta ची मोनोपोली आहे असा FTC चा आरोप आहे.
4 / 9
FTC ची नजर केवळ सोशल मीडिया कंपनी Meta वरच नव्हे तर Amazon, Google सारख्या कंपन्यांवरही आहे. एवढ्या मोठ्या दिग्गज कंपनीला कोर्टातं खेचण्याचं धाडस ज्या लीना खान यांनी दाखवलं त्या नक्की आहेत कोण याबाबत जाणून घेऊया
5 / 9
३३ वर्षीय लीना खान अँटीट्रस्ट मुद्द्याशी खूप वर्षापासून जोडल्या आहेत. जेव्हा लीना खान Yale Law School मध्ये होत्या तेव्हा अमेरिकेत अँटीट्रस्ट आणि कंपटीशन लॉ कामासाठी त्या ओळखल्या जायच्या.
6 / 9
मार्च २०२१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी लीना खान यांना कमीशनवर नियुक्त केले. जून २०२१ पासून लीना खान यावर काम करत आहेत. त्याचसोबत त्या Columbia Law School मध्येही असोसिएट प्रोफेसर म्हणून काम बघत आहेत.
7 / 9
२०१२ मध्ये FTC ने फेसबुकला १ अरब डॉलर इन्स्टाग्रामच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली होती. त्यावेळी कंपनीत केवळ १३ कर्मचारी होते. त्यानंतर २०१४ मध्ये फेसबुकने इन्स्टंट मॅसेजिंग App व्हॉट्सअपला १९ अरब डॉलरमध्ये खरेदी केले होते.
8 / 9
आता FTC चा आरोप आहे की, फेसबुक क्रमाक्रमाने त्यांच्या कंपटिटर्सला खरेदी करत मोनोपोली बनवत आहे. कंपनीच्या वाढत्या प्रभावामुळे ग्राहकांना खूप कमी पर्याय राहत आहेत. त्याचसोबत या बाजारात नवीन तंत्रज्ञान आणि बिझनेस आयडियाही येत नाहीत. त्यामुळे प्रायव्हेसी प्रोटेक्शनमध्येही घट झाली आहे.
9 / 9
अमेरिकेच्या अँटीट्रस्ट मोनोपोली लॉ चा पुढाकार करणाऱ्या लीना खानने त्यांच्या करिअरमध्ये मोठ्या तंत्रज्ञान कंपनीला आव्हान दिले आहे. परंतु मेटाने आपल्या बचावासाठी लीनाच्या इमेजचा वापर केला आहे. कंपनीचा दावा आहे की, लीना कंपन्याबाबत पक्षपाती धोरण अवलंबते. तर या प्रकरणाची सुनावणी करणारे फेडरल जज यांना मेटाचा दावा फेटाळून लावला आहे.
टॅग्स :MetaमेटाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्राम