शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Amazon Sale: गेमिंग लॅपटॉप झाले स्वस्त; दमदार परफॉर्मन्सवर मिळतेय मोठी सवलत

By सिद्धेश जाधव | Published: January 29, 2022 6:47 PM

1 / 6
अ‍ॅमेझॉनवर ग्रँड गेमिंग डेज सेलमध्ये अनेक गेमिंग अ‍ॅक्सेसरीजवर सूट दिली जात आहे. तसेच गेमिंग लॅपटॉप देखील स्वस्तात विकत घेता येत आहेत. आज आपण यातील पाच डील्स पाहणार आहोत.
2 / 6
Acer Nitro 5 AN515-57 हा लॅपटॉप 68,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा गेमिंग लॅप्टॉप Intel Core i5-11400H प्रॉसेसरसह येतो. कंपनीनं यात 8GB RAM आणि 256GB SSD + 1TB HDD स्टोरेज दिली आहे. सोबत 4GB NVIDIA GeForce RTX 3050 ग्राफिक्स मेमरी देण्यात आली आहे. यात 144Hz रिफ्रेश रेट असलेला 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. एसरचा हा लॅपटॉप Windows 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
3 / 6
ASUS TUF Dash F15 (2021) ची किंमत 67,990 रुपये आहे आणि अ‍ॅमेझॉन सेलमध्ये यावर 1,000 रुपयांची सूट मिळत आहे. यात 144Hz रिफ्रेश रेट असलेला 15.6-इंचाचा मोठा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा लॅपटॉप 11th Gen Intel Core i5 11300H प्रॉसेसरवर चालतो. सोबत 8GB RAM, 512GB SSD स्टोरेज आणि 4GB NVIDIA GeForce RTX 3050 ग्राफिक्स मेमरी देण्यात आली आहे. यात Windows 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
4 / 6
Lenovo Legion 5 या सेलमध्ये 64,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याला AMD Ryzen 5 4600H प्रॉसेसरची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8GB RAM आणि 256GB SSD + 1TB HDD स्टोरेज मिळते. ग्राफिक्ससाठी 4GB NVIDIA GeForce GTX 1650 मिळतो. यात 120Hz रिफ्रेश रेट असलेला 15.6-इंच FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये Windows 10 चं Home एडिशन मिळतं.
5 / 6
HP Pavilion मध्ये 10th Gen Intel Core i5 10300H प्रॉसेसर देण्यात आला आहे. सोबत 4GB NVIDIA GeForce GTX 1650 Ti ग्राफिक्स मेमरी मेमरी मिळते. हा लॅपटॉप 8GB RAM आणि 256GB SSD + 1TB HDD स्टोरेजसह विकत घेता येईल. 144Hz रिफ्रेश रेट असलेला 15.6-इंचाचा मोठा FHD डिस्प्ले देखील यात मिळतो. Windows 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा हा लॅपटॉप 64,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
6 / 6
HP Victus ची किंमत 59,990 रुपये आहे. यात AMD Ryzen 5 5600H प्रॉसेसर देण्यात आला आहे. सोबत 8GB RAM आणि 512GB SSD स्टोरेज मिळते. या गेमिंग लॅपटॉप 4GB NVIDIA GeForce GTX 1650 ग्राफिक्स मेमरी देखील देण्यात आली आहे. यात 16.1-इंचाच्या FHD Flicker Free स्क्रीनसह यात Windows 10 Home ऑपरेटिंग सिस्टम मिळते.
टॅग्स :laptopलॅपटॉपamazonअ‍ॅमेझॉन