नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:41 IST
1 / 10सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत. आता Ghibli ट्रेंडमध्ये आहे, बरेच लोक Ghibli स्टाईलमध्ये त्यांचे फोटो तयार करत आहेत. याच दरम्यान एका मीडिया रिपोर्टनुसार, सतर्क राहण्याची गरज आहे.2 / 10अनेक तज्ज्ञांनी Ghibli स्टाईल फोटोंबद्दल चिंता व्यक्त केली आहे. Ghibli स्टाईल फोटो तयार करण्यासाठी युजर्स त्यांच्या चेहऱ्याचे डिटेल्स इतर वेबसाइटवर शेअर करतात. जर ही माहिती सायबर स्कॅमर्सपर्यंत पोहोचली तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.3 / 10ChatGPT व्यतिरिक्त, Ghibli स्टाईल फोटो तयार करण्याचा दावा करणारे अनेक एप्स आणि पोर्टल आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे का की, स्कॅमर बनावट वेबसाइट तयार करून तुमची फसवणूक देखील करू शकतात. 4 / 10जर तुम्ही ChatGPT व्यतिरिक्त इतर वेबसाइट्स आणि टूल्स वापरून Ghibli इमेजेस तयार करत असाल तर सावधगिरी बाळगा. अनेकांना वाटतं की कदाचित ते फक्त एक फोटो तयार करत आहे. हे फक्त Ghibli पुरतं मर्यादित नाही, या प्रक्रियेदरम्यान आपल्या चेहऱ्याचे डिटेल्स त्या वेबसाइटला दिले जातात.5 / 10सायबर गुन्हेगार तुमचा चेहरा वापरून तुमचाच फोन अनलॉक करू शकतात. स्कॅमर सोशल मीडियावर फोटो टॅग करू शकतात किंवा विविध डिजिटल सर्व्हिस एक्सेस करू शकतात. ते तुमचं मोठं नुकसान करू शकतात.6 / 10फेस रेकग्निशनच्या मदतीने अनेक एप्स अनलॉक करता येतात. अशा परिस्थितीत, सायबर गुन्हेगार हे तपशील चोरू शकतात आणि तुमचे एप्स अनलॉक करू शकतात आणि UPI पिन वापरून पैसे ट्रान्सफर करू शकतात.7 / 10Ghibli इमेज तयार करताना नेहमी अधिकृत वेबसाइट वापरा. सायबर स्कॅमर अनेकदा सुप्रसिद्ध वेबसाइट्ससारखंच डोमेन तयार करतात आणि नंतर निष्पाप लोकांची फसवणूक करतात.8 / 10सायबर स्कॅमर अनेकदा स्वस्त आणि मोफत अशा गोष्टींचं आमिष दाखवून लोकांना फसवतात. येथे ते तुम्हाला स्वस्त प्लॅन किंवा प्री-सर्व्हिसबद्दल सांगतात आणि तेथून ते तुमचे तपशील इत्यादी चोरू शकतात.9 / 10Ghibli शैलीतील फोटोंमध्ये पेटींगसारखे सॉफ्ट कलर टोन, डिटेलिंग आणि मॅजिकल थीम असतात, हे फोटो आजकाल इंटरनेटवर खूप लोकप्रिय आहेत. OpenAI च्या नवीन टूलच्या मदतीने, ही स्पेशल आर्ट स्टाईल सहजपणे पुन्हा तयार केली जाऊ शकते.10 / 10Ghibli स्टाईल फोटोची सुरुवात जपानच्या एका प्रसिद्ध एनिमेशन कंपनीपासून झाली आहे. ही कंपनी हयाओ मियाजाकी यांनी तयार केली आहे. हा स्टुडीओ Spirited Away, My Neighbor Totoro और Kiki's Delivery Service सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.