शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तंत्रज्ञानाची कमाल! आता इंटरनेटशिवायही वापरता येणार Gmail; 'य़ा' 5 स्टेप्स करा फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 7:19 PM

1 / 8
इंटरनेट आणि अ‍ॅप्सच्या युगात कोणतेही अ‍ॅप वापरण्यासाठी आपल्याला मेल आयडीने लॉग इन करावे लागते आणि त्यामुळे क्वचितच असे लोक असतील ज्यांचे ईमेल अकाउंट नसेल. बहुतांश लोक गुगलची मेलिंग सेवा जीमेल वापरतात.
2 / 8
जीमेलवर मेल पाठवण्यासाठी आणि मेल मिळवण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. आज आपण अशाच एका ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला इंटरनेटशिवाय जीमेलवर मेल पाठवता येणार आहे.
3 / 8
अनेक लोक जीमेल वापरतात परंतु इंटरनेटशिवायही तुम्ही मेल पाठवू आणि प्राप्त करू शकता हे फार कमी लोकांना माहीत असेल. आज आपण जीमेलच्या ऑफलाईन मोडबद्दल जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही जीमेलवर इंटरनेटशिवाय आलेले मेल वाचू शकता, त्यांना उत्तर देऊ शकता आणि मेल शोधू शकाल.
4 / 8
जीमेल ऑफलाईन वापरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर गुगल क्रोम डाउनलोड करावे लागेल. जीमेल ऑफलाईन फक्त क्रोम ब्राउझर विंडोमध्ये वापरला जाऊ शकतो, तुम्ही हे फीचर इनकॉग्निटो मोडमध्ये वापरू शकत नाही.
5 / 8
तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर क्रोम विंडो उघडल्यानंतर, तुम्हाला जीमेल ऑफलाइन सेटिंग्जवर जावे लागेल किंवा https://mail.google.com/mail/u/0/#settings/offline’ या लिंकवर क्लिक करावे लागेल.
6 / 8
तुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल. या विंडोमध्ये ऑफलाइन मेल एनेबल करा असा पर्याय असेल. आता तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
7 / 8
आता तुम्हाला तुमच्यानुसार सेटिंग्ज बदलावी लागतील किंवा कस्टमाइझ करावी लागेल. तुम्हाला किती दिवसांचे मेल सिंक करायचे आहेत ते तुम्ही येथे निवडू शकता जेणेकरून तुम्हाला त्या दिवसांचे मेल ऑफलाईन मोडमध्येही मिळू शकतील.
8 / 8
आता तुम्हाला सेव्ह चेंजेस हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा जीमेल ऑफलाईन मोड अ‍ॅक्टिव्हेट कराल आणि ते सहजपणे वापरू शकाल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञान