खूशखबर! Apple ची मोठी घोषणा: iPhone 13, 14 , 15 ची किंमत झाली कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 18:29 IST
1 / 9आयफोन खरेदी करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण ॲपलने आपल्या अनेक फोन्सची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.2 / 9कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे ग्राहकांची ६ हजार रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. कंपनीने पहिल्यांदाच आपल्या प्रो मॉडल्सची किंमतदेखील कमी केली आहे.3 / 9ॲपल कंपनीकडून iPhone 13, iPhone 14, iPhone 15 सह iPhone SE ची किंमतही कमी करण्यात आली आहे.4 / 9ॲपलच्या या स्मार्टफोन्सला तुम्ही कंपनीच्या अधिकृत स्टोरमधून कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात.5 / 9कंपनीच्या अधिकृत स्टोरच्या व्यतिरिक्त दुसरे रिटेल पार्टनर्सही लवकरच कमी किंमतीसह आयफोनची विक्री करू शकतात. 6 / 9किती कमी झाली किंमत? ॲपल कंपनीने iPhone 13, iPhone 14, iPhone 15 या फोन्सची किंमत ३०० रुपयांनी कमी केली आहे. तसंच iPhone SE ची किंमत २ हजार ३०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. 7 / 9आयफोनच्या प्रो मॉडेल्सचा विचार करता कंपनीने या स्मार्टफोन्सची किंमत ५ हजार १०० रुपयांपासून ६ हजार रुपयांपर्यंत कमी केली आहे.8 / 9विशेष म्हणजे पहिल्यांदाच आयफोनच्या प्रो मॉडेल्सची किंमत कमी करण्यात आली आहे.9 / 9दरम्यान, सरकारने मोबाइल फोन्स आणि अनेक पार्ट्सवरील कस्टम ड्युटी २० टक्क्यांहून १५ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळेच ॲपलकडून आपल्या स्मार्टफोन्सची किंमत कमी करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.