Good news for BSNLs customers Now every user will get Super Fast Internet 4g
BSNL च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता प्रत्येक युझरला मिळणार Super Fast Internet By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 3:20 PM1 / 10सध्या सर्वच दूरसंचार कंपन्यांमध्ये आपले ग्राहक आपल्याकडेच ठेवण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक कंपन्या काही ना काही नव्या योजना सुरू करत आहेत. 2 / 10सध्या सर्वच कंपन्या ४जी सेवा देत असल्या तरी सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल अद्यापही ३जी सेवाच देत आहे. अशा परिस्थितीत BSNL च्या ग्राहकांसाठी आता चांगली बातमी आहे. 3 / 10सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आता आपल्या ग्राहकांना चांगलं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. आता BSNL च्या ग्राहकांनाही वेगवान इंटरनेटचा फायदा घेता येणार आहे. 4 / 10Telecomtalk ने दिलेल्या माहितीनुसार BSNL च्या ग्राहकांनाही आता वेगवान ४जी सेवा मिळणार आहे. 5 / 10सरकारनं BSNL ला संपूर्ण देशात हायब्रिड ४जी सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. BSNL लवकर यासाठी निविदा काढणार आहे. 6 / 10आंतरराष्ट्रीय वेंडर्स देशात ५७ हजार साईट्सना ४जी हायब्रिड इंटनेटसाठी अपग्रेड करतील. 7 / 10समोर आलेल्या माहितीनुसार नोकिया आणि एरिक्सन या कंपन्या एकत्र मिळून BSNL चं ४ जी अपग्रेड प्लॅनसाठी अर्ज करू शकतात. 8 / 10रिपोर्टनुसार BSNL या वर्षाच्या अखेरिस संपूर्ण देशात ४जी सेवा सुरू करू शकते. 9 / 10यापूर्वी BSNL नं १ जानेवारी २०२१ रोजी आगामी 4G टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय कंपन्यांकडून प्रायर रजिस्ट्रेशन / प्रुफ ऑफ कॉन्सेप्टसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवले होते.10 / 10BSNL च्या रिव्हायवल प्लॅनसाठी केंद्र सरकारनं दोन वर्षांपूर्वीच मंजुरी दिली होती. याअंतर्गत, टेलिकॉम कंपनीला बजेट वाटपाच्या माध्यमातून 4G सेवांसाठी स्पेक्ट्रमच्या प्रशासकीय वाटपाचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications