By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 11:32 IST
1 / 7अर्थसंकल्पापूर्वीच रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे. रेल्वे लवकरच स्वरेल (SwaRail) नावाचे नवीन अॅप लाँच करणार आहे. हे अॅप प्रवाशांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी देणार आहे. सध्या हे अॅप बीटा टेस्टिंगमध्ये आहे व हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. बुकिंगपासून ते प्रवासापर्यंत सारे काही सोपे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2 / 7यामध्ये तुम्ही तिकीट बुकिंग, ट्रेनची माहिती, कॅटरिंग सेवा आणि अन्य सेवा घेता येणार आहेत. या अॅपच्या वापराने मोबाईलमधील स्टोरेज स्पेसही वाचणार आहे. तसेच एप वापराचा अनुभवही चांगला येणार आहे. चला पाहुया या सेंट्रल रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) ने विकसित केलेल्या या सुपर अॅपमध्ये काय काय फिचर्स आहेत. 3 / 7या अॅपमध्ये प्रामुख्याने आरक्षित तिकीट बुकिंग, अनारक्षित तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग, पार्सल आणि मालवाहतूक सेवांबद्दल माहिती, ट्रेन आणि पीएनआर स्थिती माहिती, ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करणे, तक्रारी नोंदवण्यासाठी रेल मदत सुविधा या सर्व गोष्टी एकत्रच असणार आहेत. 4 / 7या अॅपमध्ये लॉगिन करण्यासाठी एकच युजरनेम, पासवर्ड लागणार आहे. एकाच लॉगिनमध्ये तुम्ही या सेवा घेऊ शकणार आहात.तसेच याच लॉगिनद्वारे तुम्ही आयआरसीटीसी रेलकनेक्ट आणि यूटीएस मोबाईल अॅप सारख्या इतर भारतीय रेल्वे अॅप्सवर देखील वापर करू शकणार आहात.5 / 7आरक्षण आणि अनारक्षित तिकीट बुकिंगसाठी वेगवेगळे अॅप वापरावे लागतात. तसेच ट्रेनचा रनिंग स्टेटस, लोकेशन आणि वेळापत्रक पाहण्यासाठी वेगळे अॅप वापरावे लागत आहेत. हे सर्व एकाच अॅपवर येणार आहे. 6 / 7पीएनआरसोबत ट्रेनची अन्य माहितीही दाखविली जाणार आहे. अशाच वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला दिल्या जाणार आहेत. 7 / 7या अॅपवर लॉगिन करण्यासाठी तुम्ही सध्याचे रेलकनेक्ट किंवा युटीएस अॅपच्या लॉगिनचा वापर करू शकणार आहात. यासाठी वेगळे अकाऊंट उघडायची गरज नाही.