By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:03 IST
1 / 7व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने अॅपमध्ये आणखी एक नवीन 'अॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी' फीचर दिले आहे, हे वैयक्तिक आणि ग्रुप चॅट्सना आणखी सुरक्षित बनवत आहे.2 / 7हे नवीन गोपनीयता आणि सुरक्षा फिचर मीडिया सेव्ह करणे आणि चॅट कंटेंट एक्सपोर्ट करणे टाळण्यासाठी डिझाइन केले आहे.3 / 7WhatsApp आधीच मेसेजेस आणि कॉल्ससाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन ऑफर करते, तर नवीन अॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर वापरकर्त्यांना अधिक गोपनीयतेसाठी WhatsApp बाहेरील कंटेंट इतरांसोबत शेअर करण्यापासून रोखण्यासाठी डिझाइन केले आहे. हे नवीन फीचर iOS आणि Android डिव्हाइसवरील WhatsApp वापरकर्त्यांसाठी रोल आउट करण्यास सुरुवात झाली आहे.4 / 7इन्स्टंट मेसेजिंग अॅपने जारी केलेले हे अॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर कंपनीने सादर केले आहे. व्हॉट्सअॅपने सांगितले की, वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये उपलब्ध असलेले हे नवीन फीचर मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या बाहेर इतरांना कंटेंट शेअर करण्यापासून रोखून गोपनीयतेचा अतिरिक्त स्तर जोडते.5 / 7एकदा तुम्ही हे सेटिंग चालू केले की, अॅडव्हान्स्ड चॅट गोपनीयता तुम्हाला तुमचे चॅट इतरांना एक्सपोर्ट निर्यात करण्यापासून थांबवते.6 / 7हे तुम्ही पाठवत असलेल्या मीडियाला इतर वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर स्वयंचलितपणे डाउनलोड होण्यापासून थांबवते. हे फिचर चॅटमधील प्रत्येकाला खात्री देण्यास मदत करते. हे संभाषण चॅटच्या बाहेर शेअर केले जाण्याची शक्यता कमी आहे.7 / 7हे खास फीचर चालू करण्यासाठी, तुम्हाला चॅटच्या नावावर क्लिक करावे लागेल आणि अॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसीमध्ये जावे लागेल. अॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर चालू करावे लागेल. कंपनीचे म्हणणे आहे की, हे नवीन सेटिंग व्हॉट्सअॅपची नवीन व्हर्जन वापरणाऱ्या सर्व वापरकर्त्यांसाठी आणली जात आहे.