नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
आनंदाची बातमी: कमी किंमतीत येणार नवा iPhone; ३५ हजार रुपये असेल किंमत, लॉन्च कधी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 18:34 IST
1 / 13आपल्याकडेही आयफोन असावा, असं स्वप्न अनेकांचं असतं. मात्र या फोनच्या महागड्या किंमतीमुळे अनेकजण आयफोन घेणं टाळतात किंवा हा फोन स्वस्त होण्याची वाट पाहतात.2 / 13स्वस्तात आणि बजेटमध्ये आयफोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण अॅपल आपला स्वस्तातील फोन लवकरच लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.3 / 13अॅपलकडून नेक्स्ट जनरेशन iPhone SE मॉडल लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. कमी किंमतीत उपलब्ध होणाऱ्या या फोनमध्ये कंपनी लेटेस्ट फीचर्सही देण्याची शक्यता आहे.4 / 13अॅपलच्या नव्या iPhone चे काही फीचर्स सोशल मीडियावर लीक झाले असून या फीचर्सनी ग्राहकांचं लक्ष वेधलं आहे.5 / 13मिळालेल्या माहितीनुसार, iPhone SE चे नवे व्हर्जन 2025 मध्ये लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे. हा एक 4h जनरेशन आयफोन असेल, ज्यामध्ये अनेक मोठे बदल पाहायल मिळतील.6 / 13या आयफोनमध्ये A18 चिपसेट सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. तसंच आर्टिफिशयल इंटेलिजेंसही या फोनमध्ये उपलब्ध असू शकते. हीच बाब iPhone 16 मध्येही दिसण्याची शक्यता आहे.7 / 13iPhone SE 4 मध्ये iOS 18 अपडेट आणि 6 GB रॅम व 8 GB रोमसह बाजारात आणलं जाण्याची शक्यता आहे. 8 / 13दरम्यान iPhone SE या स्मार्टफोनमध्ये 6.06 इंच OLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तसंच 60 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आलाय. 9 / 13आयफोनच्या आगामी व्हर्जनमध्ये सर्क्युलर टच आइडला हटवलं जाऊ शकतं. त्याऐवजी फेसआय सेंसर दिला जाऊ शक10 / 13iPhone SE मध्ये सिंगल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कॅमेरा सेंसरचा विचार करता 48 MP सपोर्ट दिला जाणार असून 12 MP फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.11 / 13नवीन आयफोनला मॉडर्न लूक आणि फ्लॅट अॅल्युमिनियम फ्रेममध्ये सादर केला जाण्याची शक्यता आहे.12 / 13दरम्यान, आयफोनच्या या व्हर्जनची किंमत नक्की किती असणार, याबाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.13 / 13मिळालेल्या माहितीनुसार, iPhone SE च्या नव्या मॉडला ४२९ डॉलर म्हणजेच भारतीय किंमतीनुसार ३५ हजार रुपयांच्या किंमतीसर लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे.