google announces lamda at google io you can talk to pluto
Google LaMDA : टेबल, खुर्ची आणि दरवाज्यासोबत बोलू शकणार, कसे? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 3:39 PM1 / 9Google IO 2021: गुगलने आपल्या वार्षिक डेव्हलपर परिषदेत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित LaMDA मॉडेल सादर केले. हे प्रायोगिक (एक्स्पेरिमेंटल ) मॉडेल आहे, ज्या अंतर्गत कोणतीही व्यक्ती कोणत्याही वस्तूशी संवाद साधू शकते. आगामी काळात, जर LaMDA मॉडेलद्वारे घरातील खुर्ची किंवा दरवाज्यासोबत तुम्ही काही प्रश्न विचारला आणि त्याने उत्तर दिल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही.2 / 9यावेळी कंपनीने एक डेमोंस्ट्रेशन दाखविले. यादरम्यान प्लूटोसोबत करण्यात आलेले संभाषण दाखविण्यात आले. गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, LaMDA कोणत्याही विषयावर संभाषण कसे सुरू करू शकते, हे पाहणे अत्यंत रंजक आहे. तसेच, पिचाई यांच्या म्हणण्यानुसार, LaMDA हे सेंसिंबल आणि मनोरंजक गोष्टी देखील करू शकते.3 / 9दरम्यान, LaMDA सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि त्याच्याकडून काही चुका होत आहेत. कंपनीने एक डेमोंस्ट्रेशन व्हिडिओ देखील दाखविला आहे. या व्हिडिओमध्ये, प्लूटोच्या माध्यमातून मानवाद्वारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे LaMDA देत आहे. 4 / 9दुसर्या व्हिडिओमध्ये, LaMDA पेपर प्लेनप्रमाणे मानवी प्रश्नांची उत्तरे देत आहे. उत्तरे साधी आणि सोपी नाहीत. उत्तरात मानवी स्पर्श दिला गेला आहे, ज्यामुळे असे वाटते की तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत आहात.5 / 9या मॉडेलच्या माध्यमातून कंपनीला वाटते की, मनुष्य कोणत्याही वस्तू किंवा कोणत्याही गॅझेट्ससोबत संवाद साधू शकेल. उदाहरणार्थ, येणार्या काळात हे शक्य आहे की या तंत्रज्ञानाद्वारे तुम्ही आपल्या दरवाज्याला विचारू शकाल की, दिवसभरात कोण आले होते? दरवाजाचे उत्तर मशीनसारखे असणार नाही, तर यामध्ये एक मानवी स्पर्श (ह्युमन टच) असेल आणि आपल्याला एक मनोरंजकपद्धतीने संपूर्ण माहिती देऊ शकेल.6 / 9कंपनीने म्हटले आहे की, LaMDA चे कॉन्वर्सेशनल स्किल्स बर्याच वर्षांपासून विकसित केली जात आहे. यासाठी न्यूरल आर्किटेक्चरचा उपयोग केला गेला आहे, ज्याला जीपीटी -3 म्हणतात. हे गुगलद्वारे 2017 मध्येच तयार केले होते. हे आर्किटेक्चर एक मॉडेल प्रोड्यूस करते, ज्याला बरेच शब्द वाचण्याचे (वर्ड्स रीड) प्रशिक्षण दिले गेले आहे.7 / 9महत्त्वाचे म्हणजे, गुगल बर्याच काळापासून आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर काम करत आहे. काही वर्षांपूर्वी कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड कॉल सिस्टमची घोषणा केली होती. 8 / 9कंपनीने म्हटले आहे की, याद्वारे गुगल असिस्टेंट तुम्हाला कॉल करेल आणि रेस्टॉरंट्समध्ये टेबल बुक करेल किंवा अपॉईंटमेंट बुक घेईल. परंतु, हे फीचर काहीच ठिकाणी आहे आणि त्याचा वापर जास्त नाही.9 / 9म्हणजेच, बर्याच वेळा गुगलकडून आपल्या इव्हेंटमध्ये क्रांतिकारी पद्धतीने येणाऱ्या फीचर्सविषयी सांगण्यात येते. परंतु अनेक वर्षांनंतरही त्याचा कोणताही विशेष वापर दिसून येत नाही. त्याचप्रमाणे हे फीचर किती वर्षांत मेनस्ट्रीममध्ये येईल, हे पाहावे लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications