शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुगलने आणले जगातील सर्वात स्मार्ट AI जेमिनी; ५७ विषयांमध्ये मास्टर आणि बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 3:26 PM

1 / 8
वर्षभर एआयवरून जगभरात चांगले-वाईट सर्वच बोलले गेले. अनेकांनी एआय नोकऱ्या घालवणार असे सांगितले जात होते. ओपन एआयच्या चॅटजीपीटीने खळबळ उडवून दिली होती. यामुळे गुगलने या वर्षाच्या सुरुवातीला बार्ड नावाचे एआय टूल लाँच केले होते. आता वर्षाच्या अखेरीस गुगलने आणखी एक धमाका करत मायक्रोसॉफ्टची ताकद मिळालेल्या चॅटजीपीटीसोबत नवीन रेस सुरु केली आहे.
2 / 8
कंपनीने आपले नवीन AI टूल जेमिनी लाँच केले आहे, जे LLM म्हणजेच लार्ज लँग्वेज मॉड्यूलवर काम करते. गुगलने जूनमध्ये झालेल्या I/O डेव्हलपर्स कॉन्फरन्स इव्हेंटमध्ये या टूलबाबत माहिती दिली होती. गुगल डीपमाईंडचे सीईओ डेमिस हसाबिस यांनी याची घोषणा केली.
3 / 8
AI मॉडेल्सच्या विकासातील हे एक मोठे पाऊल आहे, ज्याचा परिणाम सर्व Google उत्पादनांवर होईल, असे ते म्हणाले. तर जेमिनीचे स्वागत करताना गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी राशीचा संदर्भ दिला आहे.
4 / 8
कंपनीने गुगल जेमिनी तीन व्हर्जनमध्ये लॉन्च केले आहे. त्याची सर्वात लहान आवृत्ती नॅनो आहे, ज्यामध्ये Android डिव्हाइसवर ऑफलाइन देखील काम करण्याची क्षमता आहे. याचे चांगले व्हर्जन जेमिनी प्रो आहे, जे तुम्ही लवकरच अनुभवू शकणार आहात.
5 / 8
तिसरे व्हर्जन Google Gemini Ultra आहे, जे फक्त कल्पना करता येईल अशा एआय क्षमतेने सज्ज आहे. हे डेटा सेंटर आणि एंटरप्राइझ वापरासाठी डिझाइन केले आहे. जेमिनी अल्ट्रा सध्या मर्यादित लोकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. कारण त्याची टेस्टिंग अद्याप पूर्ण झालेली नाहीय.
6 / 8
Gemini Pro हे बार्डवर वापरता येणार आहे. गुगलने जेमिनी नॅनोची काही फिचर्स गुगल पिक्सल ८ प्रोवर उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे.
7 / 8
जेमिनी एआय फक्त माहिती देण्यापुरते मर्यादित नाही. ते मजकूर, कोड, ऑडिओ, फोटो आणि व्हिडिओ समजू आणि ऑपरेट करू शकते. गुगलने याचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये जेमिनी एका कागदावर सतत होत असलेली क्रिएटिविटी पाहून प्रतिसाद देत आहे.
8 / 8
गणित, भौतिकशास्त्र, इतिहास, कायदा, वैद्यकीय आणि नीतिशास्त्र असे ५७ विषय जेमिनी हाताळू शकणार आहे. एवढेच नाही तर कोडिंगही करू शकणार आहे. Gemini Ultra हे पहिले असे मॉडेल आहे जे मनुष्यासारखे काम करू शकणार आहे.
टॅग्स :googleगुगलArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स