Google आणणार स्मार्ट डेबिट कार्ड, Appleला देणार टक्कर! By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 3:59 PM
1 / 8 Apple सारखेच Google सुद्धा फिजिकल कार्ड लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, गुगल फिजिकल आणि व्हर्च्युअल डेबिट कार्ड्स तयार करत आहे. 2 / 8 टेक क्रंचच्या एक रिपोर्टनुसार, गुगलने आगामी डेबिट कार्डची एक इमेज पब्लिश केली आहे. गुगल कार्ड आणि यासंबंधी अकाउंटच्या माध्यमातून ग्राहकांना शॉपिंग करता येऊ शकेल. हे कार्ड मोबाईल किंवा ऑनलाइनद्वारे वापरले जाऊ शकते. 3 / 8 रिपोर्टनुसार, गुगलने या कार्डसाठी विविध बँकांसोबत पार्टनर्शिप केली आहे. यामध्ये सिटी आणि स्टॅनफोर्ड फेडरल क्रेडिट युनियन यांचा समावेश आहे. 4 / 8 गुगलच्या या डेबिड कार्डला गुगलच्या अॅपद्वारे मॉनिटर आणि कनेक्ट केले जाऊ शकते. यामधून ट्रान्जक्शन हिस्ट्रीपासून बॅलन्स चेक करणे,अकाउंट लॉक करणे यासारख्या सुविधा असू शकतात. 5 / 8 गुगलचे हे फिजिकल डेबिट कार्ड Google Pay च्या अंतर्गत काम करणार आहे. दरम्यान, गुगलने २०१४ मध्ये Google Wallet ची सुरुवात केली होती. त्यावेळीही कंपनीने Google Wallet च्या बॅलन्सचा वापर करण्यासाठी डेबिट कार्ड देण्यास सुरुवात केली होती. 6 / 8 दोन वर्षानंतर म्हणजेच २०१६ ला गुगलने Google Wallet बंद केले. त्यानंतर गुगलने अशा अॅपला Google Pay म्हणून लाँच केले. भारतात पहिल्यांदा गुगलने Tez लाँच केले. मात्र, त्यानंतर कंपनीने त्याला Google Pay मध्ये कनव्हर्ट केले. 7 / 8 दरम्यान, जर गुगलने आपले फिजिकल कार्ड लाँच केले. तर एकप्रकारे Apple Card ला टक्कर देऊ शकेल. सध्या Apple Card भारतात नाही आहे. गुगल सुद्धा आपले फिजिकल डेबिट कार्ड फक्त अमेरिकेत लाँच करण्याची शक्यता आहे. 8 / 8 भारतात Google Pay खूप लोकप्रिय आहे. गुगल कंपनीने यासाठी काही डेडिकेटेड फीचर्स सुद्धा आहेत. त्यामुळे उशिरा का होईना, कंपनी आपले फिजिकल कार्ड भारतात लाँच करेल, अशी आशा आहे. आणखी वाचा