google give opportunity to win 7 crore to find security bugs in android 12
Google कडून ७ कोटींचे बक्षीस मिळवण्याची संधी; केवळ ‘हे’ काम करा अन् मालामाल व्हा By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 7:02 PM1 / 10नवी दिल्ली: जागतिक स्तरावर Google एवढं मोठं सर्च इंजिन दुसरं शोधून सापडणार नाही. गुगलला माहिती नाही, असं क्वचितच या जगात काही असेल. आजच्या काळात कोणत्याची गोष्टीची माहिती हवी असेल, तर प्रथम गुगल केलं जातं.2 / 10Google ने टेक्निकल प्रोफेशनलसाठी एक जबरदस्त घोषणा केली आहे. नवीन घोषणा अंतर्गत गुगलने म्हटले की, त्यांच्या अँड्रॉयड १२ च्या दोन्ही बिल्टमध्ये सिक्योरिटीमध्ये जो कोणी बग शोधेल त्याला गुगल ७ कोटी रुपये देणार आहे. 3 / 10गुगलने नुकतीच Andriod 12 चे पब्लिक बीटा व्हर्जन जारी केले आहे. Andtiod १२ चे बीटा व्हर्जन सध्या काही युजर्संसाठी आहे. याचा स्टेबल व्हर्जन यावर्षीच्या अखेरपर्यंत रिलीज करण्यात येणार आहे.4 / 10Android 12 च्या बीटा व्हर्जन सोबत काही फीचर्सचा आनंद घेऊ शकता. बीटा व्हर्जन मध्ये बग असू शकतो. याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. 5 / 10याचा परिणाम युझर्सच्या फोन फंक्शनवर पडू शकतो. त्यासाठीच गुगलने ही मोठी घोषणा केली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 6 / 10गुगलने म्हटले १८ मे ते १८ जून पर्यंत यातील बग शोधल्यास त्याला ५० टक्के बोनस रिवॉर्ड अमाउंट सोबत दिली जाणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, काही आणि नॉन अँड्रॉयड बग आहेत. जे अँड्रॉयड सिक्योरिटीसाठी कमकुवत आहेत. 7 / 10याला रिवॉर्ड प्रोग्राम अंतर्गत घेतले जाऊ शकते. सिक्योरिटी रिचर्सर जे गुगल बग बाउंटी प्रोग्रामचा भाग बनणार आहे. त्याला लेटेस्ट Android 12 Beta 1 आणि Android 12 Beta चे १.१ला अनालाइज करावे लागणार आहे.8 / 10हे पिक्सल डिव्हाइससाठी उपलब्ध आहे. अँड्रॉयड सिक्योरिटी रिवॉर्ड प्रोग्राम मध्ये बग्स कव्हर केले जातील. जे एलिजिबल डिव्हाइसवर उपलब्ध आहे. कंपनीचा दुसरा रिवॉर्ड प्रोग्रामचा भाग नाही. 9 / 10एलिजिबल डिव्हाइस जो या प्रोग्रामचा भाग आहे, तो Pixel 5, Pixel 4a, Pixel 4a 5G, Pixel 4, Pixel 4 XL, Pixel 3a, Pixel 3a XL, Pixel 3 आणि Pixel 3 XL चा आहे.10 / 10गुगलकडून देण्यात आलेले हे सर्वांत मोठे आव्हान असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, टेक्निकल प्रोफेशनल्ससाठी ही मोठी संधी असून, गुगलकडून ७ कोटींचे बक्षीस मिळवण्याची उत्तम संधी असल्याचे म्हटले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications