शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Google कात टाकणार! 15 अ‍ॅप्समध्ये मोठा बदल, युट्युब बंद करण्याचा देखील निर्णय

By सिद्धेश जाधव | Published: May 18, 2022 4:57 PM

1 / 15
हे गुगलचं फाईल मॅनेजर अ‍ॅप आहे, जे फक्त फाईल्स मॅनेज करत नाही तर स्टोरेज फ्री करण्यासाठी मदत करतं. फाईल्स अ‍ॅपमध्ये आता व्हर्टिकल इंटरफेस येईल आणि नेव्हिगेशनमध्ये सुधार करण्यात येईल. यामुळे अँड्रॉइड टॅबलेटवर याचा वापर सहज करता येईल.
2 / 15
टॅबलेटसाठी ऑप्टिमाइज केल्यामुळे आता गुगलच्या कॅल्क्युलेटर अ‍ॅपमध्ये टू कॉलम व्यू देण्यात येईल.
3 / 15
लोकांना मार्ग दाखवणाऱ्या या गुगल अ‍ॅपमध्ये देखील बदल करण्यात येईल. टॅबलेटवर Maps स्प्लिट कॉलम व्यू दिसले. परंतु चांगला अ‍ॅक्सेस देण्यासाठी बॉटम बार डावीकडे सरकवण्यात येईल.
4 / 15
या अ‍ॅपच्या मदतीनं पालक त्यांच्या मुलांच्या स्मार्टफोनवर लक्ष ठेऊ शकतात. आता यातील नेव्हिगेशन ड्रॉवर नव्या लूकसह सादर करण्यात येईल.
5 / 15
काही दिवसांपूर्वी कंपनीनं युट्युब अ‍ॅपच गो व्हर्जन बंद करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. आता जास्त मोठे बदल दिसले नाहीत तरी युट्युब अँड्रॉइड टॅबलेटसाठी ऑप्टिमाइज करण्यात येईल.
6 / 15
गुगलचं व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅपचा लूक देखील अँड्रॉइड टॅबलेटवर वेगळा असेल. मोठ्या स्क्रीनवर जास्त सेंट्रलाइज कंट्रोल्स देण्यात येतील.
7 / 15
लोकांना भाषांतरात मदत करणार हे अ‍ॅप देखील नव्या रूपात समोर येईल. यात कोणते बदल होतील याची माहिती मात्र मिळाली नाही.
8 / 15
जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ब्राउजरमध्ये टॅबलेटसाठी कोणताही बदल करण्याची गरज नाही. परंतु आता टॅबलेटवरील क्रोममध्ये मल्टी टास्किंग करता येणार आहे.
9 / 15
टॅबलेटवर जीमेलच्या फोल्डर आणि लेबल्सच्या वरच्या बाजूला ड्रॉवर एक दिसेल.
10 / 15
अनेक अँड्रॉइड युजर्सच्या आठवणी गुगल फोटोजवर सुरक्षित आहेत. कंपनीनं आधीच हे अ‍ॅप अँड्रॉइड टॅबलेटसाठी रेडी केलं आहे परंतु काही नवीन बदल देखील लवकरच दिसू शकतात.
11 / 15
Google One अ‍ॅपच्या नेव्हिगेशन ड्रॉवरमध्ये बदल करण्यात येईल.
12 / 15
अँड्रॉइडमधील डिफॉल्ट मेसिजिंग अ‍ॅपमध्ये टू कॉलम व्यू दिसेल तसेच इतर अनेक फीचर्स देण्यात येतील.
13 / 15
स्पॉटीफायला टक्कर देणाऱ्या अ‍ॅपच्या टॅबलेट व्हर्जनमध्ये कमी जागा घेणारा डबल कॉलम व्यू आणि नेव्हिगेशन रेल मिळेल.
14 / 15
बहुपयोगी Google Lens चा वापर युजर्स फोटोवरील मजकूर टेक्स्टमध्ये रूपांतरित करण्यासाठी जास्त करतात. सध्या या अ‍ॅपचा वापर पोर्ट्रेट मोडमध्ये करण्यात येतो. परंतु टॅबलेटसाठी ऑप्टिमाइज करताना हे ओरिएंटेशन बदलू शकतात आणि इतर काही बदल देखील दिसू शकतात.
15 / 15
गुगल कॅलेंडर वापरताना जास्त समस्या येत नाहीत. त्यामुळे हे अ‍ॅप कशाप्रकारे ऑप्टिमाइज केलं जाईल हे अजून समजलं नाही.
टॅग्स :googleगुगल