गुगलच्या कर्मचाऱ्यांची वाढली डोकेदुखी! जागतिक मंदीत कंपनीने उचलले मोठं पाऊलं By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 12:18 PM1 / 8जगभरात मंदीचे सावट पसरले आहे. जगातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. काही दिवसापूर्वी शेअरचॅट, फेसबुक, अॅमेझॉन या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. आता या पार्श्वभूमीवर गुगलनेही मोठा निर्णय घेतला आहे. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने नुकतेच १२ हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा केली आहे. 2 / 8गुगलने ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. यात मानसिक आरोग्य आणि कल्याण विभागाचे प्रमुख, क्रिस्टिन मॅकझ्को यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर गुगलर्सना तणावमुक्त ठेवण्याची जबाबदारी होती. 3 / 8गेल्या १५ वर्षांपासून त्या कंपनीत कार्यरत होत्या आणि त्यांनी विविध विभागात काम केले आहे. २०२१ मध्ये त्यांच्याकडे मानसिक आरोग्य आणि कल्याण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्यासह इतर अनेक कर्मचाऱ्यांनाही विभागातून काढून टाकण्यात आले आहे.4 / 8गुगलच नाही तर मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि अॅमेझॉन सारख्या इतर टेक दिग्गज कंपन्यांनी गेल्या दोन महिन्यांत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. क्रिस्टिननेही लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली आहे. वेलबीइंग टीममध्ये क्रिस्टिनसोबत काम करणाऱ्या एलिझाबेथचा यांनाही या महिन्याच्या सुरुवातीला काढून टाकण्यात आले होते.5 / 8क्रिस्टिनने LinkedIn वर लिहिले, “माझ्या मनात गेल्या काही दिवसांपासून मनात येत आहे. माझे मित्र आणि सहकारी ज्यांच्यासोबत मी Google मध्ये काम केले आहे त्यांना सोडून गेल्याचे मला खूप वाईट वाटत आहे.6 / 8मी जीवनात नवीन सुरुवात करत आहे आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.” क्रिस्टिन आणि तिच्या सहकाऱ्यांना अशा वेळी काढून टाकण्यात आले आहे, जेव्हा Google वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची सर्वात जास्त गरज होती. कारण मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गेल्यामुळे गुगलचे कर्मचारी कठीण काळातून जात आहेत.7 / 8वेलबीइंग टीममधील उर्वरित कर्मचाऱ्यांबद्दल क्रिस्टीनाने लिहिले की, आता त्यांच्या खांद्यावर अधिक जबाबदारी आली आहे. 'त्या Googlers साठी जे बाकी आहेत, आम्हाला तुमची आता पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे, तुम्ही काय कराल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.' मेटल हेल्थ अँड वेलबीइंग शाखा कार्यरत राहतील की नाही हे Google ने अजुनही ऑफीसीअली जाहीर केलेले नाही. 8 / 8वेलबीइंग टीममधील उर्वरित कर्मचाऱ्यांबद्दल क्रिस्टीनाने लिहिले की, आता त्यांच्या खांद्यावर अधिक जबाबदारी आली आहे. 'त्या Googlers साठी जे बाकी आहेत, आम्हाला तुमची आता पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे, तुम्ही काय कराल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.' मेटल हेल्थ अँड वेलबीइंग शाखा कार्यरत राहतील की नाही हे Google ने अजुनही ऑफीसीअली जाहीर केलेले नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications