शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ट्रेनच्या तिकिटासाठी रांग लावण्याची गरज नाही; Google Pay करेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 3:46 PM

1 / 9
यूपीआय आधारित पेमेंट अ‍ॅप 'गुगल पे' मध्ये आता युजर्सना उपयुक्त असणारं एक महत्त्वपूर्ण फीचर अ‍ॅड करण्यात आलं आहे. गुगल पेच्या मदतीने सोप्या पद्धतीने ट्रेनच्या तिकिटाचं बुकिंग करता येणार आहे. अ‍ॅपवर IRCTC च्या माध्यमातून तिकीट बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. हे फीचर अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युजर्सना वापरता येणार आहे.
2 / 9
तिकीट बुकिंगसाठी गुगल पे अ‍ॅपमध्ये Trains नावाचा पर्याय दिसेल जो Businesses अंतर्गत दिलेला आहे. त्यावर क्लिक करून आपण रेल्वे तिकीट बुक, कॅन्सल, स्टेट्स पाहता येणार आहे.
3 / 9
बुकिंग सुविधा असलेल्या अ‍ॅप्सप्रमाणे या अ‍ॅपला सुद्धा आयआरसीटीसी अकाऊंट लॉग इन करणं गरजेचं आहे. गुगल पे च्या माध्यमातून तिकीट बूक केल्यानंतर एक्स्ट्रा चार्ज लागणार नाही.
4 / 9
सर्वप्रथम गुगल पे अ‍ॅप ओपन करा. त्यानंतर बिजनेस सेक्शनमधील ट्रेन या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर बुक तिकीट या पर्यायावर क्लिक करा.
5 / 9
ट्रेनचे तिकीट बूक करताना कोणत्या स्थानकापासून कोणत्या स्थानकापर्यंत प्रवास करणार आहात याचा तपशील द्या. तसेच प्रवासाची तारीख आणि विचारण्यात आलेल्या अन्य प्रश्नांची उत्तर द्या.
6 / 9
ट्रेन संदर्भात काही माहिती समोर दिसेल. सीट्स पाहण्यासाठी Check availability वर क्लिक करा. त्यानंतर ज्या क्लासमधून तुम्हाला प्रवास करायचा आहे त्यावर क्लिक करा.
7 / 9
IRCTC अकाऊंटबाबतचे सर्व तपशील द्यावे लागतील. तुमचे जर अकाऊंट नसेल तर या ठिकाणी नवीन अकाऊंट ओपन करण्याचा पर्याय ही देण्यात आला आहे.
8 / 9
तिकीट बुकिंग संदर्भात सर्व माहिती दिल्यानंतर ती Confirm करण्यासाठी Continue वर क्लिक करा. तसेच तिकिटासाठी लागमारे पैसे भरा आणि Proceed to continue वर क्लिक करा.
9 / 9
तुमचा यूपीआय पिन टाका. पिन टाकल्यानंतर IRCTC पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक केल्यास तुमचे तिकीट बूक होईल. त्यानंतर कन्फर्मेशनची एक स्क्रीन दिसेल.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेgoogleगुगल