शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Google वर चुकूनही 'या' प्रश्नांची उत्तरं शोधू नका, अन्यथा थेट तुरुंगात होईल रवानगी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 9:46 AM

1 / 7
सध्याच्या काळात इंटरनेट हे आपल्या माहितीसाठी सर्वात मोठं माध्यम झालं आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी आपण थेट गुगलवर सर्च करतो. अशा परिस्थितीत जाणून घ्या काही गोष्टी अशा आहेत, ज्या तुम्ही चुकूनही गुगलवर सर्च करू नये, अन्यथा यासंबंधीच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं.
2 / 7
गुगलवर चुकूनही मुलांशी संबंधित अश्लील मजकूर किंवा अश्लील व्हिडिओ सर्च करू नका. भारतात, POCSO कायदा २०१२ च्या कलम १४ अंतर्गत चाइल्ड पॉर्न पाहणे, बनवणे आणि बाळगणे हा कायदेशीर गुन्हा आहे. असे करताना पकडल्यास ५ ते ७ वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. अशा वेळी चुकूनही गुगलवर चाइल्ड पॉर्न सर्च करू नका.
3 / 7
तुम्ही चुकूनही बॉम्ब बनवण्याचे टेक्निक गुगलवर सर्च करू नका. असे केले तर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर तुम्ही पहिले असाल. अशा वेळी विनाकारण अडचणीत पडायचे नसेल तर गुगलवर बॉम्ब बनवण्याचे टेक्निक कधीच गुगलवर शोधू नका, अगदी चेष्टेनेही.
4 / 7
चित्रपट ऑनलाइन अपलोड करणे किंवा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची पायरेटेड आवृत्ती ऑनलाइन लीक करणे बेकायदेशीर आहे. याशिवाय, पायरेटेड चित्रपट ऑनलाइन डाउनलोड करणे देखील बेकायदेशीर आहे, जे तुम्हाला तुरुंगात पाठवू शकते.
5 / 7
भारतात योग्य डॉक्टरांच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे देखील बेकायदेशीर आहे. अशा स्थितीत गर्भपात कसा करायचा हे तुम्ही गुगलवर सर्च करत असाल तर तुम्ही अजून अडचणीत येऊ शकता.
6 / 7
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार, अत्याचार आणि विनयभंग झालेल्या कोणत्याही पीडितेचे खरं नाव, पत्ता आणि फोटो उघड करू नये. कोणत्याही व्यक्ती, प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पीडितेची खरी ओळख उघड करणं बेकायदेशीर आहे. अशा परिस्थितीत गुगलवर यासंबंधी कोणताही माहिती सर्च करू नका.
7 / 7
याशिवाय, जर तुम्हाला कोणत्याही अडचणीत पडायचे नसेल, तर तुम्ही गुगलवर इतर काही गोष्टी सुद्धा कधीही शोधू नयेत. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचा ईमेल आयडी, औषधे आणि ग्राहक सेवा क्रमांक गुगलवर कधीही सर्च करू नये. गुगलवर या गोष्टी सर्च केल्याने फसवणूक होण्याची शक्यता वाढते.
टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान