google social media search of RT PCR oxygen cylinder Remdesivir peak with Covid cases
Google Search : कोरोना अन् Oxygen Cylinder सोबतच Google वर सर्वाधिक सर्च होतायत 'हे' शब्द By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 6:58 PM1 / 10सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात सध्या दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होत आहे. 2 / 10बुधवारी देशात चोवीस तासांत ३ लाख १४ हजार ८३५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. 3 / 10कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यानं ऑनलाइन सर्च पॅटर्नमध्येही मोठा फरक पाहायला मिळत आहे. 4 / 10सध्या लोकं मोठ्या प्रमाणात कोरोनाशी निगडीत बाबी सर्च करत आहे. युझर्सद्वारे करण्यात आलेल्या सर्चमध्ये रेमडेसिवीस इंजेक्शन, आरटी-पीसीआर टेस्ट, ऑक्सिजन सिलिंडर, रुग्णालयात बेज अशा कीवर्ड्सचा समावेश आहे. 5 / 10इंडियन एक्स्प्रेसनं या संदर्भातील काही डेटा गोळा केला आहे. यानुसार महाराष्ट्रातीस लोकांनी सर्वाधिक वेळा रेमडेसिवीर नियर मी असं सर्च केलं आहे.6 / 10तर दिल्लीत राहणाऱ्यांनी ऑक्सिजन सिलिंडर नियर मी, कोविड आरटी पीसीआर टेस्ट नियर मी आणि कोविड हॉस्पीटल नियर मी अशा काही टर्म्स सर्च केल्या आहेत. 7 / 10याव्यतिरिक्त ७ ते १३ मार्चदरम्यान लोकांनी सर्च मध्ये आणखी एक टर्म वाढवली आहे. या दरम्यान लोकांनी कोविड वॅक्सिनेशन सेंटर नियर मी अशी टर्म सर्च केल्याचं समोर आलं आहे. 8 / 10कोरोना विषाणूशी निगडीत या आवश्यक बाबींबाबत सर्च करणाऱ्या लोकांनी गुगल व्यतिरिक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्म्सचीही मदत घेतली आहे. 9 / 10या ठिकाणी लोकं पोस्ट टाकून आपल्या ओळखीच्या लोकांची किंवा नातेवाईकांची मदत घेत आहेत. 10 / 10७ एप्रिल पर्यंत मिळालेल्या डेटानुसार प्रत्येक तासाला तब्बल २०० पेक्षा अधिक वेळा रेमडेसिवीर हा शब्द सर्च करण्यात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications