Google will fight with Tiktok; Brought an app tangi for short videos
गुगल Tiktok ची 'टांग' खेचणार; छोट्या व्हिडीओंसाठी अॅप आणले By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 11:28 AM1 / 9गेल्या 2 वर्षांत टीकटॉकने जगभरात धुरळा केला आहे. भारतीय अबालवृद्धांना मजेशीर व्हिडीओंचे वेडच लावले आहे. आता याच टीकटॉकला तगडा प्रतिस्पर्धी मिळाला आहे. गुगलने Tangi नावाचे अॅप आणले आहे. 2 / 9टँगी या अॅपद्वारे छोटे क्रिएटीव्ह व्हिडीओ अपलोड करता येणार आहेत. यामध्ये युजरना नवीन गोष्टी शिकायला मिळणार असून हे व्हिडीओ मित्रांसोबतही शेअर करता येणार आहेत. 3 / 9हे अॅप सध्या वेबसाईट आणि अॅपल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. टँगी अॅप अँड्रॉईडसाठी कधी उपलब्ध केले जाईल याची माहिती देण्यात आलेली नाही. 4 / 9Tangi चा इंटरफेस दिसायला जवळपास पिंटरेस्ट आणि इन्स्टाग्रामसारखाच आहे. यामध्ये एक सर्चबार देण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही खास विषय सर्च करू शकता. 5 / 9टँगीमध्ये तुम्ही 60 सेकंदापर्यंत व्हिडीओ अपलोड करू शकता. याशिवाय एखाद्या व्हिडीओवर कमेंट टाकण्याचाही पर्याय मिळणार आहे. 6 / 9व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला ट्राय इटवर क्लिक करावे लागणार आहे. हे व्हिडीओ पाहण्यासाठी तुम्हाला एक अकाऊंट बनवावे लागणार आहे. 7 / 9हे अॅप अशा लोकांसाठी बनविण्यात आले आहे, ज्यांच्याकडे काहीतरी क्रिएटीव्ह करण्याच्या कल्पना आहेत, पण त्यांना यासाठी प्लॅटफॉर्म मिळत नाही. 8 / 9यामध्ये अनेक कॅटगरी आहेत. 9 / 9आर्ट, कुकिंग, फॅशन, लाईफस्टाईल आणि ब्युटी अशा काही कॅटॅगरी आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications