googlepay top 5 security feature make transaction secure for payment
तुम्हीही GooglePay ने पेमेंट करताय? मग, जाणून घ्या टॉप 5 सिक्योरिटी फीचर्स... By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 11:54 AM1 / 6डिजिटल पेमेंटमुळे लोकांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. लहान-मोठे आर्थिक व्यवहार करणे खूपच सोपे झाले आहे. मात्र, तितकाच ऑनलाइन फसवणुकीमुळे धोकाही वाढला आहे. तुम्ही GooglePay वापरून पेमेंट करत असल्यास, काही सिक्योरिटी टिप्स जाणून घ्या...2 / 6गुगल पे (GooglePay) अॅप फेस आयडी, पासवर्ड आणि पिन यांसारख्या सिक्योरिटी फीचर्सला सपोर्ट करते. त्यामुळे, तुमचा फोन दुसऱ्या व्यक्तीच्या हातात असला तरी तो GooglePay अॅप वापरू शकणार नाही. जर फोनमध्ये स्क्रीन लॉक फीचर चालू असेल, तर तुमचे अॅप देखील त्याच्यासोबत लॉक केले जाईल आणि इतर कोणीही ते वापरू शकणार नाही.3 / 6तुम्ही जेव्हा जेव्हा Google Pay अॅपद्वारे पैसे पाठवता तेव्हा ते तुम्हाला फसवणुकीबद्दल अलर्ट देखील देते. तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवत आहात ती व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसेल तर अॅप तुम्हाला त्याबद्दल अलर्ट करते. अॅप हे काम मशीन लर्निंग वापरून करते.4 / 6GooglePay द्वारे सर्व पेमेंट डेटा गुगल खात्यात सेव्ह केला जातो. तुमचा सर्व पेमेंट डेटा गुगलवर सुरक्षित राहतो आणि गुगल पेमेंटच्यावेळी हा डेटा एन्क्रिप्ट करते, जेणेकरून तुमचे पेमेंट पूर्णपणे सुरक्षित राहते.5 / 6ऑनलाइन पेमेंटसाठी कार्ड वापरण्यापेक्षा GooglePay वापरणे अधिक सुरक्षित असणार आहे. या अॅपवर तुमचे व्हर्च्युअल अकाउंट वापरले जाते, ज्यामुळे तुमच्या अकाउंटबद्दल कोणालाही माहिती मिळू शकत नाही किंवा तुमचे कार्ड कोणालाही कळू शकत नाही.6 / 6 GooglePay तुम्हाला प्रायव्हसी कंट्रोल करण्यासाठी फीचर्स देखील देते. या अॅपद्वारे पेमेंट करण्यासाठी तुम्ही कोणताही पर्सनलाइज्ड ट्रांजक्शनचा वापर करता, तो डीफॉल्ट म्हणून सेव्ह केला जात नाही. अॅप आपल्या ग्राहकांना 3 महिन्यांचा वेळ देते आणि जर तुम्हाला हा पर्सनलाइज्ड ट्रांजक्शन मोड आवडत नसेल तर तो डिलीट केला जाऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications