शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 9:06 AM

1 / 6
नवी दिल्ली : विमानाचा प्रवास हा महाग असला तरी तो आरामदायी आणि वेळ वाचवणारा असतो. त्यामुळे हल्ली अनेकजण आपला महत्वाचा वेळ वाचवण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देतात. दरम्यान, आता केंद्र सरकारने विमान प्रवाशांसाठी विमान प्रवासादरम्यान इंटरनेट सेवा वापरण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत.
2 / 6
विमान प्रवासादरम्यान, प्रवासी तीन हजार मीटर उंचीवर पोहोचल्यानंतरच वाय-फायद्वारे इंटरनेट सेवा वापरण्यास सक्षम असतील, असे सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या आदेशात म्हटले आहे की, प्रवासी केवळ तीन हजार मीटर उंचीवर पोहोचलेल्या विमानातच इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू शकतात.
3 / 6
केंद्र सरकारने आपल्या अधिसूचित नवीन नियमांमध्ये या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या या नव्याने अधिसूचित केलेल्या नियमाला फ्लाइट अँड मेरीटाइम कनेक्टिव्हिटी (सुधारणा) नियम, 2024 असे म्हटले जाईल.
4 / 6
केंद्र सरकारच्या आदेशात म्हटले आहे की, 'उपनियम (1) मध्ये निर्दिष्ट केलेल्या भारतीय हवाई क्षेत्रात किमान उंची असूनही, जेव्हा विमानात इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरण्याची परवानगी असेल तेव्हाच वाय-फायद्वारे इंटरनेट सेवा विमानात दिली जाईल.
5 / 6
स्थलीय मोबाईल नेटवर्कमध्ये हस्तक्षेप होऊ नये, यासाठी सरकारने अशा सूचना दिल्या आहेत. 2020 च्या सुरुवातीला सरकारने भारतातील विमान कंपन्यांना प्रवासदरम्यान प्रवाशांना मोफत वाय-फाय प्रदान करण्याची परवानगी दिली होती. यानंतर विमान प्रवासादरम्यान प्रवाशांवर घातलेले निर्बंध हटवण्यात आले.
6 / 6
नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले होते की, प्रवासी आता विमानमध्ये वाय-फाय वापरू शकतील. मात्र यासाठी दोन अटींचे पालन करावे लागेल. विमानात वाय-फाय चालू किंवा बंद करण्याचे अधिकार कॅप्टनला असतील, असे सांगण्यात आले. तसेच, विमानाचा वेग स्थिर असेल तेव्हाच वाय-फाय कार्यान्वित होईल. तसेच, ते टेक ऑफ किंवा लँडिंग दरम्यान बंद ठेवावे लागेल.
टॅग्स :airplaneविमानInternetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञान