happy 10th birthday whatsapp video calling whatsapp stories and other important features in last 10
10 वर्षांत किती बदललं WhatsApp; जाणून घ्या स्टेटस ते फीचर्सपर्यंतचा प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 4:20 PM1 / 11व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअॅप हे अॅप आता दहा वर्षांचे झाले आहे. या अॅपमध्ये गेल्या दहा वर्षांत अनेक बदल झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत जे बदल या अॅपमध्ये झाले ते जाणून घेऊया.2 / 1124 फेब्रुवारी 2009 रोजी व्हॉट्सअॅप लाँच झालं. आयफोन आणि अॅन्ड्रॉईड युजर्ससाठी हे सुरू करण्यात आलं होतं. सुरुवातीला फक्त मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅप लाँच करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर व्हॉट्सअॅपमध्ये फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासोबतचं अनेक नवनवीन फीचर्स देण्यात आले. 3 / 11व्हॉट्सअॅपवर 2010 मध्ये लोकेशन शेअरिंग फीचर देण्यात आले. या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत आपलं लोकेशन शेअर करू शकतात. 4 / 11व्हॉट्सअॅपने फेब्रुवारी 2011 मध्ये ग्रुप चॅटचं नवं फीचर आणलं. या फीचरच्या माध्यमातून ग्रुप चॅटींगची मजा घेता येते.5 / 112011 मध्ये ग्रुप चॅट, फोटो शेअरिंग यासारख्या फीचर्सची सुविधा दिल्यानंतर व्हॉट्सअॅप 2013 मध्ये आणखी एक भन्नाट फीचर युजर्ससाठी आणलं. व्हॉईस मेसेज फीचरच्या मदतीने व्हॉईस मेसेज पाठवणं अधिक सोपं झालं. 6 / 11व्हॉट्सअॅपवर 2014 मध्ये जगभरातील व्हॉट्सअॅपचे 500 मिलियन यूजर्स झाले. तसेच व्हॉट्सअॅप हे फेसबुकचे झाले. नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअॅपवर Read receipts म्हणजेचे ब्लू टिक फीचर देण्यात आले. 7 / 11व्हॉट्सअॅपवर 2015 मध्ये WhatsApp Web लाँच करण्यात आलं. याआधी केवळ मोबाईलवर व्हॉट्सअॅप वापरण्यात येत असे. मात्र व्हॉट्सअॅप वेबनंतर युजर्सना ते डेस्कटॉपवर वापरणं शक्य झालं. 8 / 11व्हॉट्सअॅपवर 2016 मध्ये end-to-end encryption फीचरची सुरुवात करण्यात आली. तसेच नोव्हेंबरमध्ये व्हिडीओ कॉलिंग हे फीचर ही लाँच करण्यात आले. 9 / 112017 मध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस हे फिचर अॅड करण्यात आले. या फीचरला युजर्सने अधिक पसंती दिली. व्हॉट्सअॅप युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फिचर्स लाँच करत असतं. 10 / 11व्हॉट्सअॅपवर 2018 मध्ये WhatsApp Business अॅपची सुरुवात करण्यात आली. तसेच व्हिडीओ ग्रुप कॉलिंग, व्हॉट्सअॅप स्टिकर्ससारखे फीचर्स लाँच करण्यात आले आहे. 11 / 11व्हॉट्सअॅपवर 2019 मध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसह अनेक नवनवीन फीचर्सची सुरुवात करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. या दहा वर्षांमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये झालेले बदल व्हॉट्सअॅपने युजर्ससमोर ठेवले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications