Has anyone blocked you on WhatsApp? Here are five ways to learn ...
तुम्हाला WhatsApp वर कोणी ब्लॉक केले आहे? 'या' पाच प्रकारे जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 3:04 PM1 / 6व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे खूप लोकप्रिय चॅटिंग अॅप आहे. अनेक जण व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. यात फीचर ब्लॉक देखील आहे. तुम्ही एखाद्याला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्यास, तो तुम्हाला या मेसेजिंग अॅपवर मेसेज किंवा कॉल करू शकणार नाही.2 / 6जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर कोणी ब्लॉक केले असेल तर ते ओळखले जाऊ शकते. मात्र, कंपनी त्या व्यक्तीला कोणी ब्लॉक केल्याची माहिती देत नाही. परंतु, ते काही मार्गांनी शोधले जाऊ शकते.3 / 6 जर तुम्हाला कोणी ब्लॉक केले असेल तर तुम्ही समोरच्या युजरचे लास्ट सीन स्टेटस पाहू शकणार नाही. मात्र, काहीवेळा प्रायव्हसी सेटिंगमुळे देखील ते दिसत नाही. जर तुम्हाला कॉन्टॅक्टचे नवीन प्रोफाइल फोटो दिसत नसल्यास, याचा अर्थ तुम्हाला ब्लॉक केले आहे.4 / 6ब्लॉक करतेवेळी असलेले प्रोफाइल फोटो असलेला फोटो नेहमी दिसत असतो. जर समोरची व्यक्ती प्रोफाईल फोटो सतत अपडेट करत असेल पण तुम्हाला तोच फोटो अनेक दिवस दिसत असेल तर तुम्हाला ब्लॉक केले आहे, असे समजू शकता.5 / 6यासाठी तुम्ही टिक्सचीही मदत घेऊ शकता. जर तुम्ही पाठविलेल्या मेसेजवर सिंगल टिक काही दिवसांपासून दिसत असेल तर त्याचा अर्थ ब्लॉक केल्याचा देखील होऊ शकतो. तुम्ही ब्लॉक केलेल्या कॉन्टॅक्टला कॉल करण्याचा प्रयत्न केल्यास, कॉल लागणार नाही.6 / 6तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे? हे शोधण्यासाठी तुम्ही त्याला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करू शकता. जर तो युजर्स व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करू शकत नसेल, तर तुम्ही समजू शकता की त्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications