शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१० हजारांपेक्षा कमी बजेट आहे? या वर्षी लाँच झाले 'हे' Smartphones, एकात आहे 5G सपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 4:13 PM

1 / 7
स्मार्टफोन्समध्ये दिवसेंदिवस अनेक नवे फीचर्स येत आहेत. अशातच त्यांचं बजेटही वाढत आहे. अधिक फीचर्स असलेल्या फोनसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. काही वर्षांपूर्वी मिड रेंज असलेले स्मार्टफोन्स १० हजार रुपयांना मिळत होते. आता या किंमतीत बजेट फोन्सही सापडणं कठीण झालं आहे.
2 / 7
काही चिनी ब्रँड्सनं कमी किंमतीच्या फोन्सद्वारे भारतात आपली जागा निर्माण केली आहे. याचमुळे वाढत्या किंमतीही आव्हान झालं आहे. या आव्हानाचा सामना करत असताना काही कंपन्या १० हजारांपेक्षा कमी किंमतीचे काही स्मार्टफोन्स लाँच करत असतात. पाहूया असेच काही स्मार्टफोन्स.
3 / 7
Redmi 10A - या बजेटमध्ये तु्म्ही Redmi 10A खरेदी करू शकता ॲमेझॉनवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. याचं 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिअंट 8,299 रुपयांमध्ये तुम्हाला मिळू शकेल. यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, 5000mAh ची बॅटरी, Helio G25 प्रोसेसर आणि 13MP चा रियर कॅमेरा मिळतो. एन्ट्री लेव्हलच्या युझर्ससाठी हा फोन चांगला ऑप्शन आहे.
4 / 7
Realme Narzo 50i Prime - कमी बजेटवाल्या दमदार स्मार्टफोनच्या लिस्टमध्ये रियलमीचा हा स्मार्टफोन सामील आहे. याच्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 11 बेस्ड यूआयवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, Unisoc T612 प्रोसेसर, 8MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रन्ट कॅमेरा मिळतो.
5 / 7
Lava Blaze 5G - लावा कंपनीचा हा एकमेव ऑप्श आहे जो 5G सपोर्टसह येतो. कंपनीनं हा स्मार्टफोन इंट्रोडक्टरी प्राईजमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, अँड्रॉईड 12 आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसर मिळतो. हा स्मार्टफोन तुम्ही 9999 रुपयांना खरेदी करू शकता.
6 / 7
Vivo Y02 - विवोनं हा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळतं. या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीनं अतिशय जुना असलेला MediaTek Helio P22 प्रोसेसर दिला आहे. तसंच हा स्मार्टफोन अँड्रॉईड 12 गो एडिशन वर काम करतो. यामध्ये 8MP चा रियर आणि 5MP का फ्रन्ट कॅमेरा मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आलीये.
7 / 7
POCO M5 - हा स्मार्टफोन 10,499 रुपयांचा सुरुवातीच्या किंमतीला उपलब्ध आहे. परंतु हा स्मार्टफोन तुम्ही डिस्काऊंटनंतर कमी किंमतीवर खरेदी करू शकता. याचं 4GB RAM आणि 64GB स्टोरेज ऑप्शन या किंमतीत उपलब्ध आहे. या हँडसेटमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच यात 5000mAh ची जबरदस्त बॅटरीही देण्यात आलीये. या स्मार्टफोनमध्ये 50MP च्या मेन लेन्स वाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. तसंच फ्रन्टमध्ये 8MP कॅमेरा देण्यात आलाय.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनoppoओप्पोVivoविवो