5G फोन घेताना फसू नका; त्यामध्ये किती बँड मिळतात ते पहा; ही पहा ‘खऱ्या’ 5G फोन्सची यादी By सिद्धेश जाधव | Published: February 16, 2022 7:19 PM
1 / 10 अजून भारतातील 5G चा लिलाव झाला नाही, त्यामुळे कुठली टेलिकॉम कंपनी कुठल्या बँड्सवर नेटवर्क लाँच करेल हे सांगता येत नाही. याचा परिणाम तुमच्या वेगावर होऊ शकतो. 2 / 10 फक्त सिंगल आणि ड्युअल बँड असलेले स्मार्टफोन्स सादर करून मोबाईल कंपन्या एकप्रकारे फसवणूक करत आहेत. यावर्षीच्या अखेरपर्यंत देशातील अनेक शहरांमध्ये 5G उपलब्ध होऊ शकतं, त्यामुळे त्याचा विचार करून स्मार्टफोन घेणार असाल तर पुढे दिलेली जास्त 5G बँड्स असलेल्या स्मार्टफोन्सची यादी तुमच्या कामी येऊ शकते. 3 / 10 Xiaomi 11T Pro स्मार्टफोन भारतात 13 5G बँड्सना सपोर्ट करतो. ज्यात n1/3/5/7/8/20/28/38/40/41/66/77/78 चा समावेश आहे. या फोनची किंमत 39,999 रुपयांपासून सुरु होते. हा फोन 6.67-इंचाचा डिस्प्ले, Snapdragon 888 चिपसेट, 5,000mAh बॅटरी आणि 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात आला आहे. 4 / 10 Moto G71 5G मध्ये n1/n3/n5/n7/n8/n20/n28/n38/n40/n41/n66/n77/n78 असे 13 5G बँड मिळतात. याची किंमत 18,999 रुपये आहे. हा फोन 6.4-इंचाचा डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी, Snapdragon 695 चिपसेट आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअपसह विकत घेता येईल. 5 / 10 13 5G बँड्स असलेला Infinix Zero 5G स्मार्टफोन 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन n1/n3/n5/n7/n8/n20/n28/n38/n40/n41/n77/n78/n79 ना सपोर्ट करतो. तसेच यात Dimensity 900 चिपसेट, 6.78-इंचाचा डिस्प्ले, 5,000mAh ची बॅटरी आणि 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. 6 / 10 Oppo Reno 7 5G ची किंमत 28,999 रुपये आहे. हा फोन n1/3/5/7/8/20/28/38/40/41/66/77/78 अशा 13 5G बँड्सना सपोर्ट करतो. 6.4-इंचाचा डिस्प्ले, Dimensity 900 चिपसेट, 4500mAh ची बॅटरी, 64MP ट्रिपल कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा या फोनमध्ये मिळतो. 7 / 10 Moto G51 5G मध्ये एक दोन नव्हे तर 12 5G बँड्स मिळतात, ज्यात n1/n3/n5/n7/n8/n20/n28/n38/n40/n41/n77/n78 चा समावेश आहे. हा फोन 14,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. फोन 6.8-इंचाचा डिस्प्ले, Snapdragon 480 Plus चिपसेट, 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह बाजारात आला आहे. 8 / 10 Oppo Reno 7 Pro 5G ची किंमत 39,999 रुपये आहे. यात n1/3/5/7/8/38/41/28A/28B/77/78 असे 11 5G बँड मिळतात. सोबत 6.55-इंचाचा डिस्प्ले, Dimensity 1200 चिपसेट, 4500mAh ची बॅटरी आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. 9 / 10 Asus ROG Phone 5s आणि 5s Pro भारतात 11 5G बँड्स सपोर्टसह लाँच झाले आहेत. यात n1/3/7/8/20/28/38/41/77/78/79 चा समावेश आहे. या फोन्सची किंमत 49,999 रुपयांपासून सुरु होते. यात 6.78-इंचाचा डिस्प्ले, Snapdragon 888+ चिपसेट, 64MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 10 / 10 Tecno Pova 5G ची किंमत 19,999 रुपये आहे. यात कंपनीनं 11 5G बँड्स देण्यात आले आहेत. सोबत 6.95-इंचाचा डिस्प्ले, Dimensity 900 चिपसेट, 6,000mAh ची बॅटरी, आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आणखी वाचा