शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar Card शी निगडीत फ्रॉडपासून वाचायचं असेल तर 'असं' चेक करा तुमचं आधार खरं आहे की खोटं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 10:03 AM

1 / 15
अनेकदा आपली फसवणूक होत असते पण आपल्याला त्याची कल्पनाही नसते. त्यामुळे आपल्याला कायमच सतर्क राहणं आवश्यक आहे. सध्या अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा आधार कार्ड काढण्यासाठी जात असतो.
2 / 15
आधार कार्डाशी निगडीतही काही फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे आपल्याला सतर्क राहणं आवश्यक आहे.
3 / 15
अनेकांना आपलं आधार कार्ड खरं आहे की बनावट याची माहिती नसते. अशा परिस्थितीत तुम्हाला याची माहिती घेणं अनिवार्य आहे.
4 / 15
आधार कार्ड खरं आहे की बनावट हे ओळखणं अतिशय सोपं आहे. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
5 / 15
सर्वप्रथम तुम्हाला https://resident.uidai.gov.in/aadhaarverification या संकेतस्थळावर जावं लागेल.
6 / 15
या पेजवर गेल्यांतर तुमच्या समोर व्हेरिफिकेशन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला एक टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक एन्टर करावा लागेल.
7 / 15
आधार कार्ड टाकल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक कॅप्चा दिसेल. त्या ठिकाणी असलेल्या बॉक्समध्ये कॅप्चा एन्टर करा.
8 / 15
यानंतर खाली देण्यात आलेला व्हेरिफाय हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. जर तुमचा आधार क्रमांक खरा असेल तर नवं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक दिसेल. तसंच तुमची माहितीदेखील ओपन होईल.
9 / 15
जर तुमचा आधार क्रमांक बनावट असेल तर तुमचं पेज ओपन होमार नाही आणि इनव्हॅलिड आधार कार्ड असं दाखवण्यात येईल.
10 / 15
जर तुमचं आधार कार्ड बनावट निघालं तर तुम्ही याबाबत तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतीही तक्रार कारायची असेल तर तुम्हाला १९४७ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येईल.
11 / 15
याशिवाय जर तुम्हाला आधार कार्डावरील फोटो बदलायचा असल्यासही तो बदलू शकता. नाव, मोबाईल क्रमांक, जन्म तारीख, ईमेल अॅड्रेस, फोटो बदलण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन प्रक्रियेचाच वापर करावा लागणार आहे.
12 / 15
जर तुम्हाला आधार कार्डावरील तुमचा फोटो बदलायचा असेल तर तुम्हाला तुमच्या नजीकच्या आधार केद्रात जाऊन त्यासाठी फॉर्म भरून द्यावा लागेल.
13 / 15
सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Get Aadhaar सेक्शनमधून आधार नामांकन/अपडेट फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
14 / 15
हा फॉर्म योग्यरित्या भरून तो आधार केंद्रात न्यावा लागेल. त्यानंतर आधार केंद्रात तुमच्या फिंगरप्रिन्ट्स, रॅटिना स्कॅन आणि फोटोग्राफ पुन्हा कॅप्चर केले जातील. आधार कार्डावर माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ५० रूपये शुल्कही जमा करावं लागेल.
15 / 15
तसंच फोटो अपडेट करण्याचा अर्ज स्वीकारल्यानंतर तुम्हाला एक यूआरएन किंवा एक अपडेट क्रमांक मिळेल. या क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही आपला अर्ज ऑनलाईन ट्रॅक करू शकता. यानंतर अपडेटेड फोटोसह तुम्हाला आधार कार्ड मिळण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी लागेल.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डonlineऑनलाइनfraudधोकेबाजीGovernmentसरकार