How to book Confirmed tatkal tickets on irctc app and website
हे काम करा म्हणजे IRCTC वरून मिळेल कन्फर्म Tatkal Ticket By सिद्धेश जाधव | Published: January 13, 2022 7:56 PM1 / 9आपले सगळेच दौरे पूर्वनियोजित नसतात. कधी कधी अचानक प्रवासाचं बेत ठरतो किंवा कामं निघतं अशा वेळी Train तिकीट बुक करण्यासाठी IRCTC च्या वेबसाईट किंवा अॅपवरून Tatkal Ticket बुक करावं लागत. 2 / 9Tatkal Ticket बुक करताना वेळ खूप महत्वाची ठरते ही वेळ वाचवण्याच्या काही टिप्स आपण आज पाहणार आहोत. जेणेकरून कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. 3 / 9कोणतंही ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी तुमचं IRCTC वर अकॉउंट असणं आवश्यक आहे. जर नसेल तर Tatkal ticket च्या आधीच ते अकॉउंट ओपन करून घ्यावं आणि ते अकॉउंट लॉगिन देखील करून ठेवावं. 4 / 9मोबाईलवरून बुक तिकीट बुक करणार असाल तर आयआरसीटीसीचं अॅप इन्स्टॉल करून त्यात लॉगिन करून घ्यावं. किंवा ब्राउजरमध्ये वेबसाईट उघडून ठेवावी. 5 / 9वेळ वाचवण्यासाठी IRCTC मोबाईल अॅपमध्ये खालच्या बाजूला My Account चा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करून My Master List चा पर्याय निवडा. 6 / 9या My Master List मध्ये तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांची माहिती आधीच टाकून ठेवू शकता. यासाठी तुम्हाला Add Passenger च्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल आणि त्या सर्व प्रवाशांची माहिती भरून ठेवावी जे तुमच्या सोबत येणार आहेत. 7 / 9आयआयसीटीसीवर AC कोचसाठी तत्काल तिकीट बुकिंग सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होते. तर नॉन-एसीसाठी 11 वाजल्यापासून स्पर्धा सुरु होते. त्यामुळे तुमची तयारी त्याआधीच पूर्ण करून घ्यावी. याआधीच काही मिनिटं लॉगिन करून घ्यावं. 8 / 9स्टेशन, डेट आणि ट्रेन सेलेक्ट करून झाल्यावर पॅसेंजर डिटेल्स टाकण्यासाठी तुम्ही Add Existing चा पर्याय निवडू शकता. म्हणजे My Master List मधील प्रवासी इथे जोडता येतील. यामुळे तुम्हाला टाईप करण्यात वेळ घालवावा लागणार नाही. 9 / 9पॅसेंजर अॅड केल्यानंतर पेमेंटची वेळ येते. इथे कार्ड किंवा नेट बँकिंगच्या ऐवजी UPI पेमेंटमुळे वेळ वाचू शकतो. तसेच आधीच बॅलेन्स असलेल्या पेटीएम किंवा तत्सम वॉलेटचा देखील वापर करता येऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications