How to calculate SAR value of mobile radiation? How much dangerous?
मोबाईलच्या रेडिएशनचे SAR प्रमाण कसे मोजाल? किती धोकादायक? By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 2:00 PM1 / 7मोबाईलमधून निघणारे रेडिएशन मोजण्याच्या पद्धतीला स्पेसिफिक अॅब्सॉर्पशन रेट (SAR) असे म्हटले जाते. भारतात हे प्रमाण 1.6 वॅट प्रती किलो एवढे आहे. तर परदेशात 2.0 वॅट प्रती किलो एवढे पकडले जाते. या एसएआर व्हॅल्यूमुळे निसर्गासह मानवावरही मोठा परिणाम होतो.2 / 7मोबाईल सारखा वापरल्याने किंवा सतत बोलल्याने गरम होतो. शिवाय त्यातून निघणाऱ्या लहरींमुळे मेंदूवरही परिणाम होतो. मोबाईल टॉवर असलेल्या ठिकाणीही पशु-पक्षी वास्तव्य करत असतील तर ते काही काळाने स्थलांतर करतात. कारण हे रेडिएशन त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करणारे असतात. 3 / 7तुमचा मोबाईल जर प्रमाणाबाहेर रेडिएशन सोडत असेल तर तो वेळीच बदलावा. कारण या रेडिएशनमुळे तुमच्या मेंदू आणि इतर अवयवांवर मोठा परिणाम होत आहे. चला पाहुया रेडिएशनची एसएआर व्हॅल्यू कशी तपासावी. 4 / 7नवीन मोबाईल घेताना त्याच्या पाठीमागे स्टीकर लावलेला असतो. त्यावर मोबाईल सोडत असलेल्या रेडिएशनची SAR व्हॅल्यू नमूद केलेली असते.5 / 7मोबाईल जसजसा जुना होत जातो तशी ही व्हॅल्यू वाढत जाते. भारतात 1.6 वॅट प्रती किलो असे या रेडिएशनचे प्रमाण आहे. त्याहून जास्त किंवा मिळतीजुळती असल्यास मोबाईल बदललेलाच बरा. 6 / 7तुमच्या मोबाईलवर एसएआर व्हॅल्यू तपासून पहायची असल्यास *#07# हा क्रमांक डायल करावा. मोबाईल बॅलन्स पाहण्यासारखाच हा क्रमांक डायल करायचा असतो. 7 / 7हा क्रमांक डायल केल्यानंतर स्क्रीनच्या खालील बाजुला दोन प्रकारच्या एसएआर व्हॅल्यू येतात. एक हेड आणि दुसरी बॉडीची असते. यापैकी एकजरी आकडा 1.6 पेक्षा जास्त दाखवत असल्यास मोबाईल बदलण्याची वेळ आली असल्याचे समजावे. आणखी वाचा Subscribe to Notifications