शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Amazon, flipkart वर रिव्ह्यू पाहून वस्तूंची खरेदी करता? सावधान, असे ओळखा फेक रिव्ह्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 2:15 PM

1 / 10
जर तुम्ही Amazon, flipkart सारख्या ई कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करण्याची सवय असेल तर तुम्ही उत्पादनांचे रिव्ह्यूदेखील नक्कीच वाचत असणार. तुमच्या माहितीसाठी हे रिव्ह्यू फेकही असू शकतात.
2 / 10
फेक रिव्ह्यूंचा नुकताच एक स्कॅम उघड झाला आहे. खराब वस्तूंचे फेक रिव्ह्यू लिहून ते किती चांगले आहेत, हे त्यामध्ये लिहिण्यात आले होते. चला तर मग कसे ओळखायचे हे खरे-खोटे रिव्ह्यू....
3 / 10
या बनावट रिव्ह्यूवरून लाखो लोक ही कमी दर्जाची उत्पादने खरेदी करतात. हे रिव्ह्यू लिहिण्यासाठी त्या लोकांना पैसे दिले जातात. या रिव्ह्यूंमुळे खराब उत्पादने देखील पाण्यासारखी विकली जातात.
4 / 10
Amazon या प्रकारापासून वाचण्यासाठी काही बदल केले होते. Amazon वर कोणत्याही उत्पादनाचा रिव्ह्यू लिहिण्यासाठी तो खरेदी करणे गरजेचे आहे. सेलर फेक रिव्ह्यू लिहिणाऱ्यासाठी ते उत्पादन खरेदी करण्याच्या बदल्यात कॅशबॅक किंवा काही गिफ्ट देऊ करतात. हे फेक रिव्ह्यू तपासण्यासाठी काही वेबसाईट किंवा टूल्सदेखील आहेत.
5 / 10
सर्वात आधी एखादा रिव्ह्यू वाचताना त्याचा टोन काय आहे ते ओळखावे. एखाद्या रिव्ह्यूमध्ये मस्त, खूप सुंदर किंवा खूप चांगला असा शब्द असेल तर सावध होण्याची वेळ आहे. काही रिव्ह्यू मोठे असतात त्यांच्या डिटेल्समध्ये गेल्यावर उत्पादनाचे डिस्क्रीप्शन असते. याशिवाय ते अधिक काही लिहू शकत नाहीत.
6 / 10
याशिवाय तुम्ही रिव्ह्यू लेंथ आणि रेटिंगवर देखील लक्ष देऊ शकता. यामध्ये तुम्हाला दिसेल की एक शब्द किंवा एका पॅरामध्येच रिव्ह्यू लिहिलेला आहे. असे असेल तर तो फेक असू शकतो.
7 / 10
याशिवाय रिव्ह्यू पॅरामिटर दिसतो, त्यामध्ये खूपच जास्त 1 स्टार किंवा 5 स्टार रेटिंग दिलेली असेल तर सावध व्हावे. एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीच्या उत्पादनाची बदनामी करण्यासाठी देखील 1 स्टार रेटिंग देण्यासाठी प्रयत्न करू शकते.
8 / 10
फेक रिव्ह्यू हे एकाच वेळी, एकाच दिवशी किंवा दोन तीन दिवस सलग असे पडलेले असू शकतात. कारण कंपन्या 100 ते 200 रिव्ह्यू बल्कमध्ये द्यायला लावतात. यामुळे रिव्ह्यूंची वेळ पहावी.
9 / 10
काही वेबसाईट अशा आहेत, ज्या फेक रिव्ह्यू असतील तर ओळखतात. यामध्ये Fakespot आणि thereviewindex वर जाऊन तुम्ही रिव्ह्यू तपासू शकता.
10 / 10
यासाठी तुम्हाला या साईटवर जाऊन वस्तूचे युआरएल पेस्ट करावे लागणार आहे. यानंतर ही साईट तुम्हाला रिव्ह्यूबाबत माहिती देणार आहे.
टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनFlipkartफ्लिपकार्ट