शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड

By सिद्धेश जाधव | Published: January 14, 2022 7:44 PM

1 / 7
एखाद्या टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज ऑफरची किंवा 5G नेटवर्क अपडेटच्या पोस्ट खाली नेटवर्क नसल्याची तक्रार करणारी एक तरी कमेंट असतेच. नेटवर्क कोणतंही असो कमकुवत नेटवर्कमुळे कॉल ड्रॉप हे होतातच.
2 / 7
कमकुवत नेटवर्कची समस्या फक्त ग्रामीण भागात नाही तर शहरी भागात देखील असते. अशा नेटवर्कमुळे फक्त कॉल नव्हे तर इंटरनेटवर देखील परिणाम होतो.
3 / 7
तुम्हाला माहित आहे का तुम्ही कॉल ड्रॉपची तक्रार टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी (TRAI) कडे करू शकता. यासाठी TRAI नं TRAI MY Call या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. यावर कॉल ड्रॉप, केबल किंवा डीटीएच संबंधित समस्यांची तक्रार करता येईल.
4 / 7
तुमची तक्रार योग्य असल्यास संबंधित टेलिकॉम कंपनीच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकतो. एखाद्या महिन्याच्या एकूण कॉल्स पैकी 2 टक्क्यांपेक्षा जास्त कॉल ड्रॉप झाल्यास ट्रायच्या नियमानुसार कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल.
5 / 7
तक्रार करण्यासाठी सर्वप्रथम फोनमध्ये MyCall app डाउनलोड करा. त्यानंतर अ‍ॅपला आवश्यक परवानग्या द्या. यात कॉन्टॅक्ट्स, कॉल हिस्ट्री, मेसेज आणि लोकेशनचा समावेश आहे.
6 / 7
त्यानंतर तुम्हाला आलेला किंवा तुम्ही केलेला कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर एक पॉप-अप विंडो समोर येईल, इथे कॉल रेटिंगचा पर्याय मिळेल.
7 / 7
कॉल रेटिंग सोबत कॉल ड्रॉपचा पर्याय देखील असेल. जर तुमचा कॉल ड्रॉप झाला असेल तर 'कॉल ड्रॉप' बटनवर टॅप करून सबमिट करा, म्हणजे तुमची तक्रार नोंदवली जाईल.
टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायtechnologyतंत्रज्ञान