शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Amazon ग्राहकांनो, तुम्ही अनावश्यक Paid Subscriptions चे शुल्क देत नाही ना? असे करू शकता कॅन्सल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 3:41 PM

1 / 10
नवी दिल्ली : ऑनलाईन वस्तूंची खरेदी करण्यासाठी आणि वेब सीरिज आणि नवीन चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही अ‍ॅमेझॉनचा (Amazon) वापर करत असाल. या व्यतिरिक्त तुम्ही अ‍ॅमेझॉन युजर आयडीवरुन काही सबस्क्रिप्शन (Subscriptions) लॉग इन केले असतील तर कदाचित आजही तुम्ही अनावश्यक चार्ज देत असाल.
2 / 10
अशावेळी कोणत्या सर्व्हिससाठी आपण सब्सक्रिप्शन घेतले होते हे आपल्या लक्षात येत नाही. यामध्ये स्ट्रीमिंग सर्व्हिस व्यतिरिक्त मॅगझिन, अ‍ॅप्स किंवा दुसरे सब्सक्रिप्शन देखील असू शकतात. आज आपण हे जाणून घेणार आहोत की अ‍ॅमेझॉनवर आपण ज्या सर्व्हिसचा वापर करत नाही त्या कशापद्धतीने रद्द करु शकतो.
3 / 10
सर्वात आधी तुम्ही हे शोधून काढा की अ‍ॅमेझॉन युजर आयडीवरुन कोण-कोणत्या गोष्टींचे सब्सक्रिप्शन घेण्यात आले आहे. जर तुम्ही अ‍ॅमेझॉनचे सब्सक्रिप्शन रद्द करत असाल तर तुम्हाला कोणताही चार्ज लागणार नाही. पण, तुम्ही त्यासोबत येणाऱ्या सर्व सुविधा गमावून बसाल. आपण स्टेप बाय स्टेप त्या पद्धती जाणून घेऊया ज्याद्वारे आपण अ‍ॅक्टिव्ह सब्सक्रिप्शनला रद्द करु शकतो.
4 / 10
- आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर अ‍ॅमेझॉनची वेबसाईट ओपन करा. त्यानंतर Account & Lists वर क्लिक करा.
5 / 10
- अ‍ॅमेझॉनच्या पेजवर तुम्हाला 'Memberships & Subscriptions' दिसेल. त्यावर क्लिक करा.
6 / 10
- याठिकाणी तुम्हाला सर्व अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅमेझॉन सबस्क्रिप्शन दिसून येतील. जे कदाचित तुमच्यासाठी गरजेचे नसतील आणि त्याचे शुल्क तुम्ही विनाकारण देत असाल.
7 / 10
- यानंतर त्याठिकाणी 'Manage subscription' हा पर्याय दिसेल. त्यावरुन तुम्ही Auto-Renew option to turn off payments and cancel your subscription करु शकता.
8 / 10
- हे देखील होऊ शकते की याठिकाणी काही पर्याय आपल्याला या पेजवरुन Auto-Renew off करण्याची परवानगी देत नसतील. यासाठी तुम्हाला दुसऱ्या Amazon Memberships पेजवर जावे लागेल. जर तुम्हाला अ‍ॅमेझॉनची Prime Membership रद्द करायची असेल तर तुम्ही हे करु शकता.
9 / 10
- 'Account & Lists' च्या drop-down menu मध्ये 'Memberships & Subscriptions' वर जाण्यापेक्षा थेट 'Prime Membership' वर क्लिक करा.
10 / 10
- या ठिकाणी तुम्हाला 'End Membership' चा पर्याय दिसेल. ज्यानंतर तुम्हाला 'Cancel My Benefits' वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमची Prime Membership देखील रद्द होईल.
टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय