How To Deactivate Coronavirus Caller Tune In Airtel Vi Jio Bsnl And Other Telecom Companies
सतत Coronavirus Caller Tune ऐकून वैतागलात? कशी बंद कराल? जाणून घ्या सोपी पद्धत By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 3:08 PM1 / 10गेल्या पावणे दोन वर्षांपासून देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. अद्याप पूर्णपणे कोरोनाचा खात्मा झालेला नाही. कोरोनाबद्दल जनजागृती करण्यासाठी सरकार विविध मार्गांचा वापर करत आहे. कॉलरट्यून हा त्यातलाच एक मार्ग.2 / 10केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दूरसंचार सेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांना कोविड-१९ कॉलरट्यून ठेवणं अनिवार्य केलं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कॉल केल्यावर आपल्याला कोविड-१९ कॉलरट्यून ऐकावी लागते. 3 / 10बीएसएनएल, एमटीएनएल, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचे मिळून ११७.२ कोटी वापरकर्ते आहेत. त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून कोविड कॉलरट्यून ऐकावी लागत आहे. सर्वात आधी खोकण्याचा आवाज यायचा. त्यानंतर कोरोनापासून बचाव करण्याचे उपाय सांगितले जायचे. 4 / 10यानंतर अमिताभ बच्चन यांचा आवाज कॉलरट्यूनमध्ये ऐकू येऊ लागला. त्यात ते दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला द्यायचे. सध्याही लोकांना कॉल करताना कॉलरट्यून ऐकावी लागत आहे. त्यामुळे अनेकजण हैराण झाले आहेत.5 / 10कॉलरट्यून ऐकणं आता अनेकांना त्रासदायक वाटू लागलं आहे. त्यामुळे कॉलरट्यून बंद करण्यासाठी अनेक जण विविध पर्याय शोधत आहेत. कोविड-१९ कॉलरट्यून बंद करण्यासाठी आम्ही काही सोप्या पद्धतींची माहिती आम्ही देत आहोत.6 / 10सर्वात आधी तुम्हाला एखाद्या व्यक्तीला कॉल करावा लागेल. तुम्हाला कोरोनाव्हायरस अलर्ट मेसेज ऐकू येताच तुम्ही १ बटण दाबावं लागेल. त्यानंतर लगेचच मेसेज बंद होईल आणि तुम्हाला नॉर्मल कॉलर ट्यून ऐकू येईल.7 / 10कोरोना कॉलर ट्यून बंद करायचे आणखीही काही मार्ग आहेत. त्यामुळे प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहक कॉलर ट्यून बंद करू शकतात.8 / 10जर तुम्ही BSNLचे ग्राहक असाल तर UNSUB लिहून 56700 किंवा 56799 वर मेसेज करा. त्यानंतर तुमच्याकडे कन्फर्मेशन मेसेज येईल.9 / 10जर तुम्ही Jio चे ग्राहक असाल तर तुमच्या नंबरवरून 155223 क्रमांकावर STOP असा मेसेज करा.10 / 10एअरटेलच्या ग्राहकांनी कॉलर ट्यून बंद करण्यासाठी 144 क्रमांकावर CANCT मेसेज पाठवावा. आणखी वाचा Subscribe to Notifications