Extra Income Tips: गुगल प्ले स्टोअरवर दर महिन्याला 50000 ते 1 लाख रुपयांची कमाई करू शकता; स्मार्टफोन हवा... By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 1:16 PM
1 / 7 देशात अशा लोकांची संख्या जास्त आहे जे चांगल्या कॉलेजमधून, किंवा शाळेतून शिकले आहेत. परंतू काही ना काही कारणामुळे ते बेरोजगार आहेत. त्यांना पैसे कमविण्यासाठी किंवा काही वस्तू घ्यायच्या असतील तर वडील, पती, पत्नी, भाऊ, बहीण आदींवर अवलंबून रहावे लागते. अशा लोकांसाठी घरबसल्या कमाई करण्याची संधी आहे. 2 / 7 फक्त तुमच्या हाती एक स्मार्टफोन आणि वेळ हवा. कोरोना संक्रमणामुळे अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. यामुळे रोजगारासाठी शहरात गेलेली गावागावातील मुले परत आली आहेत. इथे -तिथे काम मागत आहेत. अशा लोकांसाठी देखील त्यांच्या हातातील स्मार्टफोन कमाई करून देणार आहे. 3 / 7 कष्ट करून किंवा उन्हा तान्हात घाम गाळून पुरेसे पैसे मिळत नाहीत. यामुळे आम्ही तुम्हाला काही सोपे कमाई करण्याचे मार्ग सांगत आहोत. याच्या मदतीने तुम्ही दर महिन्याला काही हजार ते लाख रुपयांची कमाई करू शकता. हे उत्पन्न तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरच मिळणार आहे. 4 / 7 गुगल प्ले स्टोअरवर अशी काही अॅप आहेत ज्यावर गेम खेळून पैसे मिळवू शकता. यासाठी तुम्हाला गेम खेळण्याची आवड किंवा त्याची माहिती असणे गरजेचे आहे. हे गेम टेस्ट करण्याची संधी तुम्हाला या कंपन्या देतात. याच्या बदल्यात तुम्हाला या कंपन्या काही रक्कमही देऊ करतात. ही रक्कम तुमच्या कामाच्या म्हणजेच गेम खेळण्याच्या तासांवर अवलंबून असते. 5 / 7 जर तुम्ही जास्त वेळ गेम खेळलात तर तुम्हाला जास्त पैसे मिळतात. जर तुम्ही कमी खेळलात तर तुम्हाला कमी पैसे मिळतात. या गेम टेस्टिंग अॅपद्वारे तुम्ही महिन्याला थोडे थोडके नाही 50 हजार ते 1 लाख रुपये कमावू शकता. 6 / 7 काही कंपन्या सतत सर्वे काढत राहतात. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर असे काही अॅप आहेत जे या सर्वेच्या बदल्यात युजरला रक्कम देतात. हा सर्व्हे केल्याने 800 रुपये ते 1500 रुपयांची कमाई होऊ शकते. महिन्याला तुम्ही याच्या मदतीने 45 ते 50000 रुपये कमावू शकता. 7 / 7 यामध्ये धोका होण्याची शक्यताही आहे. गुगल प्ले स्टोअरवर तुम्ही कोणते अॅप डाऊनलोड करता यावर सारे अवलंबून आहे. तुम्ही जे अॅप शोधाल त्याची नीट माहिती काढा, त्या खालच्या कमेंट वाचा, धोक्याचे आहे का ते देखील पहा. गुगलवर सारी माहिती उपलब्ध असते. यामुळे हे करताना तुमच्या रिस्कवर, सारासार विचार करून पाऊल उचलावे. आणखी वाचा