how to extend wifi range home effective hacks
How To Increase Wifi Speed: वाय-फायचा स्पीड आणि रेंज वाढवायची आहे का? मग या गोष्टींची काळजी घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 8:30 PM1 / 5वाय-फाय राउटर जमिनीपासून थोड्या वर उंचीवर ठेवावा. कारण घरातील डिव्हाइसेस देखील जमिनीच्या उंचीवर नसतात. त्यामुळे राउटर जमिनीवर ठेवणं टाळलं पाहिजे. 2 / 5राउटर समोर वस्तूंची किंवा भिंतीची अडचण नसावी. त्यामुळे सिग्नल प्रभावित होतो आणि चांगला इंटरनेट स्पीड मिळत नाही. शक्य असल्यास मोकळ्या ठिकाणी राउटर ठेवावा. 3 / 5वाय-फाय राउटरच्या जवळ इलेक्ट्रॉनिक गॅजेट असू नये. यात टीव्ही, ब्लूटूथ हेडसेट, फ्रीज सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे तुमचा स्पीड आणि सिग्नल वाढण्यास नक्कीच मदत होईल. 4 / 5राउटरचे अँटिना अड्जस्ट करून सिग्नल सुधारे ठीक करता येतो. अनेकदा हे अँटीना झुकलेले असतात तर त्याऐवजी सरळ ठेऊन चांगला सिग्नल मिळवावा. 5 / 5आपण मोबाईल, लॅपटॉप सतत अपडेट करतो, परंतु वाय-फाय राउटरला देखील अपडेट येतात हे विसरतो. त्यामुळे सतत चेक करून राउटरचं फर्म वेयर अपडेट करावं, त्यामुळे स्पीड सुधारू शकतो. तसेच राउटरची सुरक्षा वाढते. आणखी वाचा Subscribe to Notifications