how to find your lost or stolen android smartphone
स्मार्टफोन हरवलाय? अशा पद्धतीने ट्रॅक करा लोकेशन By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 2:37 PM1 / 10स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र कधी कधी फोन हरवतो किंवा चोरीला जातो. अशा वेळी महत्त्वाचा डेटा हा फोनमध्ये सेव्ह असल्याने फोन शोधणं गरजेचं असतं. तसेच चोरीला गेलेल्या फोनमधील माहिती लीक होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळे हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन शोधायचा कसा हे जाणून घेऊया. 2 / 10हरवलेला फोन शोधण्यासाठी स्मार्टफोन ऑन असणं गरजेचं आहे. तसेच फोनमध्ये गुगल अकाऊंट म्हणजेच जीमेल लॉग इन असणं गरजेचं आहे. तुमचा स्मार्टफोन हा मोबाईल डेटा किंवा वाय-फाय कोणत्यातरी इंटरनेट माध्यमाशी जोडलेले असणे महत्त्वाचे आहे. 3 / 10स्मार्टफोनमध्ये GPS ऑन असलं पाहिजे तरच फोनचं लोकेशन समजू शकणार आहे. तसेच फोनमध्ये फाइंड माय डिव्हाईस चालू असणं गरजेचं आहे. 4 / 10सर्वप्रथम आपल्या संगणकावरून https://www.google.com/android/find या लिंकवर जा.5 / 10वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्या ई-मेल आयडीने लॉग इन करा. स्मार्टफोनमध्ये रजिस्टर असलेला किंवा कनेक्ट असलेला ई-मेल आयडी असणे गरजेचं आहे. 6 / 10लॉग इन केल्यानंतर गुगल मॅपवर तुमच्या फोनचे लोकेशन दाखवण्यात येईल. 7 / 10लोकेशनसोबतच इतरही काही पर्याय दिसतील. साउंड प्ले पर्यायावर क्लिक केल्यास तुमचा फोन सायलेंट असेल तरी त्याची रिंग वाजेल. 8 / 10लॉक या पर्यायावर क्लिक केल्यास डिस्प्ले मेसेज किंवा फोन नंबर लॉक करता येऊ शकतो. 9 / 10तिसऱ्या पर्यायावर क्लिक करून तुमच्या स्मार्टफोनमधील डेटा डिलीट करता येतो. 10 / 10या पद्धतीमुळे जर तुम्ही हरवलेला फोन शोधू शकला नाहीत तरी तुमची महत्त्वाची वैयक्तिक माहिती लीक होण्यापासून वाचवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications