तुमचे पॅन कार्ड बनावट नाही ना? By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 1:29 PM
1 / 6 बनावट पॅन आणि आधार कार्ड तयार करून देणाऱ्यांची संख्या देशात अधिक आहे. अनेकदा बनावट पॅन व आधार कार्ड तयार करून देणाऱ्या टोळ्यांचे रॅकेटही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. 2 / 6 या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. ज्यात पॅन क्यूआर कोडचा देखील समावेश आहे. 3 / 6 इन्कम टॅक्स विभागाने पॅन कार्डला क्युआर कोड जोडला आहे. क्युआर कोडवरून पॅन कार्ड खरे की खोटे हे लगेच ओळखता येते. 4 / 6 स्मार्ट फोनमध्ये क्युआर कोड स्कॅन करून ही पडताळणी करता येते. मात्र, त्यासाठी मोबाईलमध्ये इन्कम टॅक्स विभागाचे ॲप डाऊनलोड करावे लागते. 5 / 6 इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टलवर जा.व्हेरिफाय युवर पॅन या पर्यायावर क्लिक करा.त्यामुळे एक नवीन पेज सुरू होईल. त्यावर मोबाईल नंबर, जन्मतारीख व कार्ड नंबर नोंदवा. 6 / 6 तुमचा डेटा जुळतो किंवा कसे याची विचारणा करणारा एक मेसेज मोबाईलवर येईल. त्यावरून पॅन कार्ड खरे आहे की खोटे, हे समजेल. कार्ड बनावट असल्यास इन्कम टॅक्स विभागाकडे तक्रार नोंदवता येते. आणखी वाचा