how to login on whatsapp web without qr code in case lost phone or camera broken
QR कोड शिवाय WhatsApp Web करू शकता Login, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 10:10 AM1 / 10नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपचे (WhatsApp) लाखो भारतीय युजर्स आहेत, जे व्हॉईस कॉल (Voice Call) आणि व्हिडिओ चॅटद्वारे (Video Chat) संवाद साधतात. युजर्स व्हॉट्सअॅपला फोन आणि डेस्कटॉप (Desktop या दोन्हीवर एक्सेस करू शकतात. विशेष म्हणजे, व्हॉट्सअॅपचे डेस्कटॉप व्हर्जन (desktop version) फोनच्या व्हर्जनप्रमाणेच काम करते.2 / 10मोबाईलद्वारे डेस्कटॉपवर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल, तरच तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वेबचा वापर करू शकता. 3 / 10दरम्यान, ज्यावेळी तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा तुमच्या मोबाईलचा कॅमेरा कार्यरत नसेल, ज्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करणे आणि व्हॉट्सअॅप वेबवर लॉग इन करणे शक्य नाही.4 / 10अशा परिस्थितीत तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकता आणि क्यूआर कोडशिवाय व्हॉट्सअॅप वेबवर लॉग इन करू शकता. चला तर मग, आपण संपूर्ण स्टेप्सचे डिलेट्स जाणून घेऊया...5 / 10स्पेट 1 : इंटरनेटवरून BlueStacks डाऊनलोड करा आणि ते तुमच्या पीसीमध्ये इंस्टॉल करा. 6 / 10स्टेप 2 : BlueStacks अॅप स्टोअर ओपन करा आणि व्हॉट्सअॅपला सर्च मेन्यूमध्ये सर्च करा. त्यानंतर ते डाऊनलोड करा.7 / 10स्टेप 3 : तुमचा फोन नंबर टाका, जो तुम्ही व्हॉट्सअॅप व्हेरिफिकेशन कोडसाठी वापरू शकणार आहात.8 / 10स्टेप 4 : QR कोडला स्कॅन केल्याशिवाय तुमच्या PC मध्ये व्हॉट्सअॅप योग्यरित्या इंस्टॉल होईल.9 / 10स्टेप 5 : आता तुम्ही मेनू बटनवर प्रेस केल्यानंतर मॅनेज कॉन्टॅक्टच्या ऑप्शनवर क्लिक करून कॉन्टॅक्ट अॅड करू शकता, ज्यांच्याशी तुम्हाला कम्युनिकेट करायचे आहे. कॉन्टॅक्ट मॅनेज करण्याचे असे कारण आहे की तुमच्या PC वर वापरलेला फोन नंबर तुम्ही वापरत असलेल्या मोबाइल नंबरपेक्षा वेगळा असेल.10 / 10स्टेप 6 : तुम्ही तुमच्या फोनवर समान नंबर वापरत नाही, याची खात्री करुन घ्या, जो या अॅपमध्ये वापरला जात आहे. तुमचा मोबाइल नंबर आणि या अॅपचा नंबर दोन्ही ठिकाणी वेगळा असायला पाहिजे. आणखी वाचा Subscribe to Notifications