तुमच्या नावे किती सिमकार्ड्स आहेत, एका क्लिकवर पाहता येणार; गरज नसल्यास नंबर ब्लॉकही होणार By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 12:59 PM
1 / 6 सरकारी असो वा खासगी, हल्ली कोणत्याही कामासाठी आधारकार्ड लागतेच. पण बऱ्याचदा या कागदपत्रांचा गैरवापर करून मोबाईल सिमकार्ड खरेदी करण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. 2 / 6 अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दूरसंचार विभाग (डॉट) सतर्क झाला असून, एक विशेष संकेतस्थळ तयार केले आहे. त्याद्वारे आपल्या आधारकार्डवर किती सिमकार्ड सुरू आहेत याची माहिती एका क्लिकवर समजणार आहे. 3 / 6 https://tafcop.dgtelecom.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन आपला फोन नंबर सादर करावा लागेल. ‘रिक्वेस्ट ओटीपी’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ओटीपी टाकावा लागेल. 4 / 6 त्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेले सर्व मोबाईल क्रमांक संकेतस्थळावर दिसतील. वापरात नसलेले किंवा यापुढे आवश्यक नसलेले नंबर तेथे नोंदवता येतात आणि ब्लॉकही करता येतात. सध्या ही सेवा केवळ आंध्र प्रदेश आणि तेलंगणसाठीच सुरू करण्यात आलीये. 5 / 6 ओळखपत्राचा गैरवापर करून मिळवलेले सिमकार्ड बऱ्याचदा गंभीर गुन्हे घडविण्यासाठी वापरल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यात अफवा पसरवणे, अपहरण, खंडणी, दहशतवादी कारवायांसह सायबर गुन्हेगारीचाही समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळीच सतर्क करण्यासाठी दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळाचा उपयोग होऊ शकतो. 6 / 6 ‘टेलिकॉम ॲनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन’ असे या संकेतस्थळाचे नाव आहे. दूरसंचार विभागाने निर्मिलेल्या या पोर्टलद्वारे ग्राहकांना त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व फोन क्रमांक तपासता येऊ शकतात. आणखी वाचा