How Much Electricity TV On Standby Mode Consumes
TV फक्त रिमोटवरून करता बंद? विजेचं बिल वाढवते ‘ही’ छोटीशी चूक; या टिप्स करा फॉलो By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 6:09 PM1 / 7देशात करमणुकीचं साधन म्हणून टीव्हीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या करमणुकीसाठी किंमत देखील मोजावी लागते. केबल सोबत विजेच्या बिलावर देखील टीव्हीचा परिणाम होतो. 2 / 7भारतात जवळपास 70 टक्के लोक टीव्ही मेन स्विचवरून बंद करण्याऐवजी फक्त रिमोटनं बंद करतात. TV स्टँडबाय ठेवल्यामुळे विजेचं बिल वाढतं. चला जाणून घेऊया काही टिप्स ज्या तुमचं वीजबिल कमी करण्यास मदत करतील. 3 / 7काम झाल्यावर तुमच्या घरातील गॅजेट्स योग्य पद्धतीनं बंद करा. गॅजेट्स स्टँडबायवर ठेऊ नका. थेट मेन स्विच बंद करणं केव्हाही चांगलं. स्टँडबाय मोड देखील विजेचा वापर करतो, त्यामुळे वीजबिल वाढतं. 4 / 7याच सर्वात मोठं उदाहरण टीव्हीच आहे. स्टँडबाय मोडवर ठेवलेला टीव्ही रिमोटवरून येणारे सिग्नल कॅप्चर करता यावे म्हणून पावर वापरत असतो. 5 / 7टीव्हीच्या स्टँडबाय मोडमधील विजेचा वापर तुमच्या टीव्हीच्या आकार, मॉडेल आणि पावर रेटिंगवर अवलंबुन असतो. 6 / 7स्टँडबाय मोडमध्ये टीव्ही 10 वॉट पर्यंत विजेचा वापर करू शकतो, असं एक्सपर्ट सांगतात. हा वापर पावर रेटिंगनुसार कमी जास्त होऊ शकतो. 7 / 7टीव्ही स्टँडबाय मोडवर ठेवण्याऐवजी ती थेट मेन स्विचवरून बंद करावी म्हणजे तुमच्या वीज बिलात फरक दिसून येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications